robbed  esakal
जळगाव

Jalgaon : सॉफ्टवेअर अभियंत्याला भामट्यांनी लुटले

मुक्ताईनगरातील रहिवासी तरुणाला रिक्षातील तिघांनी दमदाटी करून लुटल्याची घटना पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुक्ताईनगरातील रहिवासी तरुणाला रिक्षातील तिघांनी दमदाटी करून लुटल्याची घटना पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ घडली. जिल्‍हापेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.

मुक्ताईनगरातील रहिवासी योगेश घाटे (वय २५) हा तरुण सॉफ्टवेअर अभियंता असून शुक्रवारी (ता. १७) मुक्ताईनगर ते जळगाव बसने प्रवास करून साडेचार वाजता नवीन बसस्थानकात उतरला. येथून मित्राला भेटायला जायचे असल्याने तो बसस्टॅण्ड बाहेरच ऑटो रिक्षात बसला. मात्र, त्यात पूर्वीपासूनच तीन तरुण बसलेले असल्याने त्यापैकी एकाने धक्काबुक्की करत रिक्षात जागा नाही. असे म्हणून धक्का देत योगेश घाटे याला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उतरवून दिले. तत्पूर्वी योगेशच्या खिशातील पाकीट मोबाईल काढून घेत रिक्षाने सुसाट पळून गेले. चोरट्यांनी पाकिटातील दीड हजार रोख, महाराष्ट्र व स्टेट बँकेचे एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरीने काढून घेत धमकावले. योगेश घाटे याने दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात तिघा भामट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT