Jalgaon : तब्बल 16 वर्षांपासून फरार असलेल्या जन्मठेपेतील आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

Jalgaon : तब्बल 16 वर्षांपासून फरार असलेल्या जन्मठेपेतील आरोपीला अटक

जळगाव : जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावलेल्या आरोपीला तब्बल १६ वर्षांनंतर अटक (Arrested) करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत अटक केली आहे. (Accused of absconding for 16 years arrested Jalgaon crime News)

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात वर्ष १९९९ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपी प्रदीप सोनू मेढे (वय ५८ रा. वंजारी टेकडी, समतानगर, जळगाव) यास जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरेापी मेढे याने उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठाने देखील त्याची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर आरोपीतर्फे सर्वोच्च न्यायालय (नवी दिल्ली) येथे अपील दाखल केल्यानंतर तो अपील जामिनावर सुटलेला होता.

हेही वाचा: नाशिक : शहर परिसरातून 3 दुचाकी चोरी

सर्वोच्च न्यायालयातही शिक्षा कायम

अपिलवर कामकाज होऊन सर्वोच्च न्यायालय यांनी सुद्धा प्रदीप मेढे याची शिक्षा कायम केली आहे. मात्र जामीनावर बाहेर आल्यापासून फरार झाल्याने प्रदीप मेढे हा न्यायालयात हजर झालेला नाही. जिल्‍हा न्यायालय, उच्च न्यायालय, आणि अंतिमतः सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्षा मोर्तब केल्यानंतर संशयित फरार असल्याने शिक्षेची अंमलबजावणी होत नव्हती. परिणामी औरंगाबाद खंडपीठातर्फे आरोपीच्या अटकेसाठी सूचना करण्यात आल्या होत्या. एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल देवढे, सुनील दामोदरे, अश्रफ शेख, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, राजेंद्र पवार यांच्या पथकाने त्यांच्या संबंधातील आणि ओळखीच्या लोकांमध्ये गुप्त बातमीदार पेरुन माहिती काढली. प्रदीप हा ओळख लपवून वास्तव्यास असल्याच्या माहितीवरून शुक्रवारी (ता. १७) रात्री त्याला समतानगरातून ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

हेही वाचा: Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी

Web Title: Accused Of Absconding For 16 Years Arrested Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top