Stone pelting in Nhavi village for keeping offensive status Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने न्हावी गावात दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगावात शिक्षण घेणाऱ्या मोहंमद शाहीद शेख अब्दुल रहीम या तरुणाने मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणी तरुणाविरोधात जळगाव येथील एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अटकेत आहे. (Stone pelting in Nhavi village for keeping offensive status Jalgaon Crime News)

या प्रकरणाचे पडसाद या तरुणाचे मूळ गाव असलेल्या न्हावी (ता. यावल) येथे उमटले. काही तरुणांनी संशयित तरुणाच्या घरावर दगडफेक करून त्याची आई आणि कुटुंबीयांना धमकावले. त्यांना मारहाण करून धमकावण्यात आले. यासोबत त्यांच्या घराबाहेरच्या मोटारसायकलींची तोडफोड देखील करण्यात आली.

या प्रकरणी मोमीनवाड्यातील रहिवासी असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दीपक शोभाराम नारवे, विशाल ऊर्फ पहाडी त्र्यंबक भोगे, तुषार कैलास जिरे, वासुदेव भोगे (पूर्ण नाव माहीत नाही) व हर्षल किरण निंबाळकर (ऊर्फ अंडेवाला) यांच्यासह सुमारे ३० ते ४० अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडला.

या फिर्यादीवरून जमावाच्या विरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात हर्षल किरण निंबाळकर ऊर्फ अंडेवाला याला अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, न्हावी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, फैजपूर येथील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, सावदा येथील सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांनी भेट दिली. गावात सध्या कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आले असून वातावरण नियंत्रणात आहे. अंमलदार प्रभाकर चौधरी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT