जळगाव : मानव विकास निर्देशांकासाठी प्रस्ताव सादर करा sakal
जळगाव

जळगाव : मानव विकास निर्देशांकासाठी प्रस्ताव सादर करा

मानव विकास आयुक्त एन. के. पाटील : जळगाव येथे आढावा बैठक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीसाठी नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांनी बुधवारी (ता. ८) येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी दुपारी आढावा बैठक झाली. तीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकजकुमार आशिया, मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, की मानव विकास ही संकल्पना जिल्ह्याऐवजी तालुका स्तरावर राबवीत या कार्यक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या तालुक्यात मानव विकास निर्देशांक कमी आहे. त्या तालुक्यात निर्देशांक उंचाविण्यासाठी शिक्षण, आरोग्य व उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर व एरंडोल या सात तालुक्यांचा यात समावेश आहे. या सातही तालुक्यांमध्ये शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी मानव विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आता या सात तालुक्यांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की या सात तालुक्यांत सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत १५७ अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. तेथे क्रमिक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. या तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळादरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तालुकास्तरावर बालभवन केंद्र स्थापन करण्यात आले असून, मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT