जळगाव

दिवसभर शेतात पिकाला पाणी दिले; आणि सायंकाळी भयंकर असे केले

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): दिवसभर शेतात बाजरीच्या पिकाला पाणी दिले. सायंकाळी मात्र घरी न परतताच त्याचा मृतदेह शेतातील एका झाडाळा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणाने झाडालाच दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कुंझर गावात शोककळा पसरली आहे.

कुंझर (ता. चाळीसगाव) येथील योगेश आबा सिसोदे (वय22) हा तरुण काल (ता.13)रोजी शेतात बाजरीला पाणी देत होता.त्याचा चुलत भाऊ दीपक हा बाजरीला पाणी भरून सायंकाळी घरी गेला. मात्र योगेश हा घरी न जाता शेतातच थांबलेला होता. रात्री योगेशची आई योगेश घरी आला नाही म्हणून दीपककडे आली. दीपकने योगेशला फोन लावला पण तो उचलत नसल्याचे लक्षात आले.यानंतर दीपक तेवढ्या रात्री दुचाकीवरून शेतात गेल्यानंतर योगेशला आवाज दिला पण काहीएक प्रतिसाद मिळाला नाही. बॅटरीच्या प्रकाशात योगेशचा शोध घेत असतांनाच विहिरीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला योगेश याने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

गावकऱ्यांची घटनास्थळी धाव..
ही माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. योगेश हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. सामाजिक कार्यात तो सतत अग्रेसर असायचा.गावातील वाघेश्वरी मंदिर परिसरात त्याने सुमारे 15 ते 20 वृक्षांची लागवड करून त्यांची निगा करून ती जगवली होती. त्याने एकाकी आत्महत्येचा निर्णय घेतल्याने गावकरी सुन्न झाले आहेत. याप्रकरणी दीपक शिसोदे याने दिलेल्या माहीतीवरुन मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Athletics: ५८.४५ मीटर लांब थ्रो आणि नवा इतिहास! समीर देशमुखने ७ वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडीत काढला!

इतकं जीव ओतून काम केलं पण... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं खरं कारण; म्हणाली, 'खूप वाईट...'

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या क्रीडांगणांवर आता CCTV, चेंजिंग रूम आणि टॉयलेट अनिवार्य! महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Kharghar Disabled girl : संतापजनक! नवी मुंबईत 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; पीडिता चार महिन्यांची राहिली गर्भवती

SCROLL FOR NEXT