'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा ! 

'ती' च्या जिद्दीला सलाम.. गावाच्या समृद्धीसाठी एकटीचा लढा ! 

शनिमांडळ : आज प्रत्येक जन आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे, आपल्या कुटूंबाच्या प्रगतीसाठी झटत आहे अशाही युगात एखादी व्यक्ती आपला संसार प्रपंच सांभाळून गावासाठी काही काम करत असेल त्यातही ती व्यक्ती एखादी महिला असेल तर नक्क्कीच ऐकणाऱ्याच्या भुवया उंचावल्या नाहीत तरच नवलचं. कारण ग्रामीण भागात एखाद्या महिलेने पुढे येत ग्रामविकासासाठी धडपड करणं दुर्मिळच.
 

नंदुरबार तालुक्यातील वावद गावच्या अंगणवाडी सेविका सुनीता ताई लहान मुलांच्या आयुष्याला आकार देताना गावलाही समृद्ध करण्याचं स्वप्न बघत आहेत, मागील वर्षी झालेल्या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत झालेल्या गावकरी प्रशिक्षणाला त्यावेळेचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अंगणवाडी सेविका यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते त्यातूनच सुनीता ताईंनी पाणी फाऊंडेशन चे प्रशिक्षण पूर्ण केले आणि तिथेच त्यांनी आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखली व गावासाठी काम करण्याचा निश्चयच केला.

महिलांना एकत्र आणून जलसंधारणचे काम

वाॅटर कप स्पर्धत गावातील अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी महिलांना एकत्र आणत गावात मोठया प्रमाणात जलसंधारनाचे काम उभे केले. गावाला पाणीदार करण्याचे स्वप्न त्यांनी जिद्दीने पूर्ण केले याचा मोठा फायदाही गावाला झाला. पाणी फाऊंडेशन या वर्षी राबवत असलेल्या समृद्ध गाव स्पर्धेतही त्या हिरीरीने काम करीत आहेत.
 

कोरोना काळात पूर्ण केले प्रशिक्षण

कोरोना पार्श्वभूमीवर समृद्ध गाव स्पर्धेचे गावकरी प्रशिक्षण या वेळेला होऊ शकले नसते तरी पाणी फाऊंडेशन ने गावकर्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. वेगवेगळ्या टप्पावर दिले जात असलेले हे प्रशिक्षण ह्या सुनीता ताईंनी न चुकता पूर्ण करीत आहे. 

सुनीताताई पून्हा मैदानात 

विहीर पाणी पातळी मोजमाप या विषयावरील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांना जलव्यवस्थापन करण्यासाठी गावातील विहिरींची पाणी पातळी मोजण्याचे सांगण्यात आले होते. गाव शिवारात फिरून विहीर मोजणे हे जिकरीचे काम परंतु सुनीता ताईंनी इथेही मागे न रहाता पुन्हा मैदानात येऊन सकाळी अंगणवाडी मुलांना शिकवून दुपारी स्वतः मेजरिंग टेप घेऊन विहीर मोजमापाला निघाल्या,व आपल्या शिवारातील विहिरीची पाणी पातळी मोजून पूर्ण केली.  
 

तर..भविष्यात पाणी टंचाई

सुनीताई या बोलतांना म्हणाल्या, की भविष्यात पाणी टंचाई मोठी असणार आहे. वातावरणात होणारे बदलामुळे शेती करणे अवघड होणार आहे त्यासाठी सुधारणे करणे गरजेचे आहे त्याची सुरवात आपण आता केली नाही तर खुप उशीर होईल आपल्या मुलांसाठी आपण शेती,जमीन,पाणी राखून ठेवले पाहिजे त्यासाठीच मी काम करीत आहे असे त्यांनी सांगितले याच्या या कार्या इतर गावानेही प्रेरणा घेऊन आपल्या गावाला समृद्ध करावे.
 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com