crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : प्रांतांवरील हल्लाप्रकरणी पाचोऱ्यातून तिघांना अटक

अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेले एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर जीवघेणा हल्ला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेले एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

पाचोरा येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकाने त्यांना घेरले व कासोदा पोलिसांच्या ताब्यात दिले. (Three arrested from Pachora in connection with attack on provinces jalgaon news)

अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड व महसूल विभागाचे पथक एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदी पात्रात गेले असताना तेथे प्रांताधिकारी गायकवाड यांच्या अंगावर वाळूचे ट्रॅक्टर घालून तसेच दगडफेक करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणातील हल्लेखोरांचा शोध सुरू असताना हे हल्लेखोर पाचोरा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यावेळी त्यांनी सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, विजय पाटील, रणजित पाटील, अश्विनी सावकारे यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

त्यानुसार हे पथक पाचोरा येथे पोहोचले व पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आकाश राजेंद्र पाटील (वय २६), अमोल अरुण चौधरी (वय ३२), दादाभाऊ महादेव गाडेकर (वय ३६) (सर्व रा.पाचोरा) यांना ताब्यात घेतले.

तिघांनाही कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT