Throwing himself under running train Extreme step taken by Jalgaon youth news esakal
जळगाव

Jalgaon News : धावत्या रेल्वेखाली झोकून देत जळगावी तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरीविठ्ठल नगरजवळ रेल्वेरूळावर धावत्या रेल्वे खाली सापडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला.

सोमवारी (ता.५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दीपक भगवान महाजन (वय-३१ रा. समता नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Throwing himself under running train Extreme step taken by Jalgaon youth news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक महाजन मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी (ता.५) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तो हरीविठ्ठल नगरातील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेसमोर आल्याने गंभीररीत्या जखमी झाला.

माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे पोलिस कर्मचारी अनिंद्र नगराळे आणि देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

स्टेशन प्रबंधक एस.एस. ठाकूर यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. मृताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

कौटुंबिक कलह की, नैराश्‍य

मृत दीपक पूर्वी आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भावासह एकत्र कुटुंबात राहत होता. काही महिन्यांपासून दीपक त्याच्या पत्नी-मुलास घेऊन वेगळा निघाला. तो रामानंद नगर रस्त्यावरील चर्चजवळ भाड्याने घर घेऊन राहत होता. त्याने घेतलेला टोकाचा निर्णय हा कौटुंबिक कलहातून की, नैराश्याच्या गर्तेत सापडून याचा तपास रामानंदनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT