sucide News esakal
जळगाव

Jalgaon News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

तरवाडे (ता. चाळीसगाव) : येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्हावे (ता. चाळीसगाव) येथील माहेरवाशीण रेखा उत्तम शिंदे (वय ४२) यांचा तरवाडे येथील उत्तम भावराव शिंदे याच्याशी १९९६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन विवाहित मुली असून, एक मुलगा अविवाहित आहे. (Tired of harassment from father in law Married suicide Jalgaon Crime News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

काही वर्षांपासून रेखाबाई पतीपासून एकट्याच राहत होत्या. पती, सासू व नणंद यांच्याकडून रेखाबाईचा वारंवार त्रास देऊन छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले असून हा छळ असह्य झाल्याने रेखाबाई यांनी (ता.२९) सायंकाळी पाचच्या सुमारास सासरच्या त्रासाला कंटाळून तरवाडे त्यांच्या घराजवळील शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रेखाबाईचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. ही माहिती मिळताच रेखाबाईच्या माहेरच्या मंडळीसह चाळीसगाव पोलिसांनी धाव घेतली. रेखाबाईचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून विच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेला.

या प्रकरणी महादू गरबड पिलोरे (रा. न्हावे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती उत्तम भाऊराव शिंदे, सासू सिंधूबाई भाऊराव शिंदे, नणंद लताबाई (बाप) भावराव शिंदे (तिन्ही रा. तरवाडे व भिकूबाई सुरेश मांडोळे, प्रल्हाद भाऊराव शिंदे (रा.टाकळी, प्र. चा. चाळीसगाव) यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT