Viral News : धक्कादायक! बायकोने चक्क रागात दाताने नवऱ्याची जीभ तोडली, 15 टाके घालूनही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral news

Viral News : धक्कादायक! बायकोने चक्क रागात दाताने नवऱ्याची जीभ तोडली, 15 टाके घालूनही...

Viral News : नवरा बायको मध्ये वाद होणे, भांडण होणे, ही सामान्य गोष्ट आहे पण हरियाणामध्ये नवरा बायकोच्या भांडणामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. बायकोने रागात दाताने नवऱ्याची जीभ तोडली. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.

सरस्वती असे या महिलेचे नाव असून तिच्या नवऱ्याचे नाव करमचंद आहे. करमचंदच्या घरच्यांनी सरस्वतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (wife chewed Husbands Tongue haryana incident goes viral )

हरियाणातील हिसार जिल्ह्यातील बरवाला गावात राहणारी सरस्वती नेहमी नवरा आणि कुटूंबासोबत भांडायची. २७ जानेवारीलाही रात्री ९च्या सुमारास करमचंद आणि सरस्वती भांडण करत होते. त्यानंतर सरस्वतीने रागाच्या भरात करमचंदच्या जीभेचा चावा घेतला.

हा चावा इतका भयानक होता की करमचंद जमीनीवर पडला आणि त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. विशेष म्हणजे हे सर्व दृष्य सासऱ्यानी म्हणजे करमचंदच्या वडिलांनी पाहिले.

जीभेला एवढी मोठी दुखापत झाल्याने त्याला काहीही बोलता येत नव्हते. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे त्याची एक तृतीयांश जीभ कापली गेली आहे. पत्नीने धारदार वस्तूने त्यांची जीभ कापली आहे. डॉक्टरांनी करमचंदच्या जिभेला 15 टाके घातले तरीसुद्धा करमचंद अजूनही बोलू शकत नाही.

सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलचं व्हायरल झालं असून नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.