Woman died due to wrong treatment method by fraud doctor jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Fraud Doctor : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू; घटनेनंतर ‘मुन्नाभाई’ डॉक्टर गावातून पसार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Doctor : तालुक्यातील कोरपावली येथे बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ‘मुन्नाभाई’ डॉक्टर गावातून पसार झाल्याचे वृत्त आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली गावात अनेक दिवसांपासून बोगस डॉक्टरकडून चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Woman died due to wrong treatment method by fraud doctor jalgaon news)

कोरपावली गावात गेल्या तीन ते चार वर्षांपासून विद्युत राय या बंगाली कथित डॉक्टरने आपला दवाखाना उघडला होता.

या बोगस डॉक्टरविरुद्ध यावल तालुका डॉक्टर असोसिएशनपासून तर गावातील सरपंच यांनी वारंवार या बोगस डॉक्टराचा दवाखाना तालुका आरोग्य यंत्रणेने बंद करावा, अशी लिखित तक्रार केली होती. तथापि, आरोग्य विभागाने या संदर्भात थातूरमातूर चौकशीच्या पलीकडे काहीच केले नाही.

त्यामुळे या बोगस डॉक्टराचा दवाखाना राजरोसपणे सुरूच होता. याच बोगस डॉक्टरमुळे एका महिलेस प्राण गमवावा लागला आहे. या बोगस डॉक्टराकडे उपचार घेणाऱ्या एका ४० वर्षीय आदिवासी महिलेचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या बोगस डॉक्टराकडे सदरच्या महिलेचा उपचार सुरू होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पण उपचार सुरू असताना चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन दिले गेल्याने तिच्या पायावर विपरीत परिणाम झाले. तिला याचा खूप त्रास होऊ लागला. दरम्यान, हा प्रकार या तोतयाच्या लक्षात आल्याने संबंधित मुन्नाभाई डॉक्टराने काही दिवसांपूर्वीच पळ काढला होता. तर, या आदिवासी महिलेचा आज मृत्यू झाला.

चौकशीची मागणी

तालुक्यात अनेक गावांमध्ये बोगस बंगाली डॉक्टर्स रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असताना त्यांच्यावर कारवाईची टाळाटाळ का करण्यात येत आहे? अशी विचारणा आता करण्यात येत आहे. या आदिवासी महिलेच्या मृत्यूची चौकशी करून तिला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

"आपण या संदर्भात त्वरित सखोल चौकशीचे आदेश देऊन संबंधित आदीवासी महिलेच्या मृत्यू जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करू." - डॉ. राजू तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, यावल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT