bison in road to problems for transportation for konkani people in banda sindhudurg
bison in road to problems for transportation for konkani people in banda sindhudurg 
कोकण

व्वा रे बहाद्दर! गाडीचा हॉर्न वाजवत गव्यांच्या कळपातून काढली वाट

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : बांदा - शिरोडा मार्गावरील पाडलोस - इटलादेवी येथे रात्रंदिवस गव्यांचा वावर नेहमी वाढतच चालला आहे. भातशेतीसह अन्य पिकांची नासधूस करणारे गवे आज चक्क रस्त्यावरच ठाण मांडून होते. त्याच दरम्यान येथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवत आरडाओरड केल्याने गव्यांनी आपला पाय जंगलाच्या दिशेने वळवला. गवे वाहतूक रोखत असल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाडलोस-इटलादेवी येथून सकाळी साडेसातच्या सुमारास न्हावेलीतील दुचाकीस्वार शालू फर्नांडिस हे बांद्याच्या दिशेने जाताना केणीवाड्याच्या पुढे पाडलोस-इटलादेवी येथे पोहोचले असता उतरणीवर त्यांना दहा ते पंधरा गव्यांचा कळप अचानक रस्त्यासमोर दिसला. नेहमीच होणाऱ्या गव्यांच्या दर्शनामुळे  फर्नांडिस घाबरले नाहीत. गव्यांनी काही वेळ वाहतूक रोखून धरली; परंतु प्रसंगावान राखत गाडीचा हॉर्न वाजवत त्यांनी त्या गव्यांना पळवून लावले.

वन विभागाजवळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही निदान ‘गव्यांचा अधिवास’ असा फलक लावण्याची तसदीही वन विभाग घेत नसल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT