ashish shelar uddhav thackeray sakal
कोकण

शिवसेना-भाजप शत्रू नाहीत, तर राजकीय विरोधक ; आशिष शेलार

अर्चना बनगे

सिंधुदुर्ग : बंदिवान महाराष्ट्र करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. जन आशीर्वाद यात्रा रोखण्यासाठी जमाव बंदी लागू केली आहे. असा आरोप भाजपचे नेते अशिष शेलार यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पुढे ते म्हणाले,जमावबंदीचे आदेश हे कोणाला रोखण्यासाठी होते की, राणें वरती प्रेम करणाऱ्या जनतेसाठी होते. जमाबंदी ही राजकीय आहे. आजच्या महाराष्ट्राचे असहिष्णूतेचे जनक हे उद्धव ठाकरे आहेत.ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही कोणाचेही दरवाजे ठोठवू. कोणाच्याही दरवाजावर उभे राहू. ओबीसीला आरक्षण मिळण्यासाठी पक्षविरहित भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यांचे कौतुक आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत. काही शत्रू नाही. हिंदुस्तान-पाकिस्तानची ही लढाई नाही. विरोधकांचा राजकीय विरोध करू. जनहितासाठी कोणत्याही दरवाजावर उभे राहू, ही भाजपची भूमिका आहे.

आजच्या महाराष्ट्राचे असहिष्णूतेचे जनक हे उद्धव ठाकरे आहेत; शेलार

सत्तेत बसलेल्या शिवसेनेला स्वतःला संयम, मर्यादा ठेवाव्या लागतील. काही गोष्टी सहनही कराव्या लागतील. म्हणून ते असहिष्णूतेचे जनतेचे जनक आहेत.आम्ही कुणाचे शत्रू नाहीत. राजकीय विरोधक म्हणून शिवसेनेवर सडेतोड टीका करणार. राज्याच्या हितासाठी कोणाच्याही दरवाजावर जाऊ. शिवसेना भाजप फक्त राजकीय विरोधक आहेत. शत्रू नाही. अशी प्रतिक्रिया ठाकरे- फडणवीस यांच्या भेटीवर अशिष शेलार यांनी दिली .

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल रत्नागिरीत गौप्यस्फोट केल्यानंतर, जन आशीर्वाद यात्रा रात्री कणकवलीत दाखल झाली. सिंधुदुर्गात जमावबंदीचे आदेश आहेत. मात्र नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रा काढण्यावर ठाम आहेत. आज ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल नारायण राणे यांच्या स्वागतावेळी कणकवलीत जमावबंदीचे उल्लंघन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT