तणावपूर्ण शांततेत राणेंच्या दौऱ्याची कणकवलीत विश्रांती

narayan rane
narayan ranesakla

कणकवली (सिंधुदुर्ग) : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होमपिच वरील यात्रेची विश्रांती शुक्रवारी रात्री तणावपूर्ण शांततेत झाली आहे. एकीकडे प्रचंड संख्येने उपस्थित असलेले भाजपचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे राणेंविरोधात संतप्त झालेले शिवसेना कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी एकत्र जमल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र रात्री दहा वाजून गेल्यामुळे राणेंनी आपले भाषण रद्द करून केवळ नागरिकांकडून सत्कार स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाला. मात्र राणेंच्या विजयाच्या घोषणा देत कणकवलीत परस्पर परिसर दणाणून सोडला होता. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही उद्धव ठाकरे जिंदाबादचा नारा लावला होता. रात्री पावणेबाराच्या सुमारास राणेंनी आपल्या कणकवलीतील निवास्थानी विश्रांती घेण्यासाठी दौऱ्याची सांगता केली. मात्र राणेंच्या निलेश आणि नितेश या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर तणाव प्रकर्षाने जाणवत होता.

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी सकाळी रत्नागिरी येथून सुरू झाली. खारेपाटण येथे सायंकाळी उशिराने दाखल झालेल्या यात्रेचा काफिला वैभववाडी येथे रात्री साडेनऊच्या सुमारास पोहचला. राणेंनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. त्यानंतर फोंडाघाट येथेही नागरिकांच्या भेटी घेऊन थेट कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक गाटला. कणकवलीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. सायंकाळी चार वाजल्यापासून ढोल पथक बडवले जात होते. सायंकाळी उशिराने जमवाजमव सुरू झाली. मात्र रात्री दहा वाजता बाजारपेठ बंद झाल्यानंतर केवळ भाजपचे कार्यकर्ते तेवढे मुख्य चौकांमध्ये थांबले होते. मात्र संवेदनशील नाका असलेल्या नरडवे चौकाच्या लगत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शेकडोंनी शिवसेना कार्यकर्ते जमले होते. यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूला चोख बंदोबस्त ठेवला होता.

साडेअकराच्या सुमारास मुख्य चौकातील सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर राणे यांचा ताफा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाला. तिथे मराठा समाजाच्या वतीने स्वागताचा कार्यक्रम काही मिनिटातच उरकण्यात आला.आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत , संदेश पारकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

narayan rane
मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलणाऱ्यांना सोडणार नाही; शिवसैनिक आक्रमक

राणे यांचा ताफा नरडवे रस्त्यावर निवास स्थानाच्या दिशेने जात असताना राणे यांचे दोन पुत्र मात्र चालत पुढे सरकत होते. यावेळी भाजपच्या वतीने राणेंच्या विजयाच्या नारा दिला होता. मात्र शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संयम राखत भाजप किंवा राणे विरुद्ध ब्रही काढला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com