bjp shiv sena gram panchayat election 2020 devrukh
bjp shiv sena gram panchayat election 2020 devrukh 
कोकण

बिनविरोधमधील 50 सदस्य भाजपचेच 

सकाळ वृत्तसेवा

देवरूख - ग्रामपंचायत निवडणुकीत संगमेश्‍वर तालुक्‍यातील 81 पैकी जास्तीतजास्त ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्‍वास भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी व्यक्त केला. बिनविरोध झालेल्या सदस्यांमधील 50 पेक्षा जास्त सदस्य, हे भाजपचे असून अनेक ठिकाणी सेनेला राष्ट्रवादीशी युती करावी लागली असून जनतेला ती पटलेली नाही. परिणामी शिवसेनेलाच याचा फटका बसेल, असा दावाही त्यांनी केला. 

तालुक्‍यात 81 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यापैकी छाननीपर्यंत 5 पेक्षा अधिक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 150 पेक्षा अधिक सदस्य विरोधात अर्ज नसल्याने बिनविरोध झाले आहेत. यानंतर आता याबाबत दावे, प्रतिदावे सुरू झाले आहेत. बिनविरोधमधील 50 पेक्षा अधिक सदस्य भाजपचे असल्याचा दावा अधटराव यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ते पक्षाच्या नावावर तर अनेक ठिकाणी ते गावाच्या आदेशानुसार गाव पॅनेलचे सदस्य म्हणून रिंगणात आहेत. 81 पैकी एकाही ग्रामपंचायतीवर आधीपासून वर्चस्व नव्हते. या सर्व ग्रामपंचायती शिवसेनेकडे होत्या. मात्र, आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरलो असून यातीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल, असे त्यांनी सांगितले. 

हे पण वाचा दख्खनचा राजा जोतिबा मंदिराची शिखरे यंदा तरी रंगणार का?
 
18 जानेवारीला आमची दिसेल ताकद 
भाजपने या वेळी कुणाचीही मदत घेतली नाही वा कुणाकडे हात पसरलेले नाही. 18 जानेवारीला आमची ताकद दिसून येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 
 
अनेक ठिकाणी सेना विरुद्ध सेना 
यापूर्वी तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक लढताना शिवसेना कुणाशीही युती करत नव्हती. आता अनेक गड हातातून जाणार, असे दिसताच शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे. मुळात जनतेला आणि शिवसैनिकांनाच ही युती मान्य नाही. अनेक ठिकाणी तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

India Lok Sabha Election Results Live : निकालाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे ऑफिस फुलांनी सजले

Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 जून 2024

Maharashtra Lok Sabha Election Results Live : राज्यात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; उद्या 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

SCROLL FOR NEXT