boat fire broke out in dabhol kokan marathi news 
कोकण

दाभोळ खाडीत पेटली बोट ; नशीब बलवत्तर म्हणून बचावला खलाशी.....

सकाऴ वृत्तसेवा

दापोली (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीत फडबंदर नजीक उभ्या असलेल्या मच्छीमारी बोटीला काल (ता.21) रोजी सायंकाळी 7.30 वाजणेचे सुमारास लागलेल्या आगीत या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बोटीत असलेल्या एकमेव खलाशाने पाण्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे.

चंद्रकांत शिगवण यांच्या मालकीची मासेमारी बोट काल सायंकाळी दाभोळ खाडीत उभी होती, शिगवण व बोटीवरील खलाशी कल्लू कुमार हे किराणा समान आणण्यासाठी दाभोळ येथे  गेले होते तर दुसरा खलाशी नीरज कुमार हा एकटाच बोटीवर होता. सायंकाळी 7.30 ते 8 वाजणेचे सुमारास या बोटीच्या पुढील भागास अचानक आग लागली, वाऱ्यामुळे आगीचा भडका वाढतच गेला, आग लागल्याचे दिसताच खलाशी नीरज कुमार याने खाडीतील पाण्यात उडी मारली, त्यानंतर खाडीतच असलेल्या इतर बोटींमधील खलाशानी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला व आग लागलेली ही बोट किनाऱ्याजवळ आणली, या आगीत या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT