कोकण

बौध्दवाडी व चिंद्रवलीत जमीन खचली; 9 कुटुंबाना स्थलांतराच्या सूचना

राजेश कळंबटे -सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडी व चिंद्रवली (Boudhwadi and Chindravali)येथील जमीन खचली असून भेगाही पडल्या आहेत. धोकादायक असलेल्या भागातील 9 कुटुंबाना तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना तहसीलदार शशिकांत जाधव यांनी दिल्या आहेत. तसेच खचलेल्या भागाजवळ चिंद्रवली येथील रेल्वे बोगद्याच्या वरच्या डोंगर भागात काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत.तहसीलदार जाधव यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी हरचेरी सरपंच, स्थानीक पंच, हरचेरी बौध्दवाडी येथील नागरीक, मंडल अधिकारी खेडशी, तलाठी हरचेरी, तलाठी उमरे, ग्रामसेवक हरचेरी, सरपंच चिंद्रवली व स्थानीक चंद्रवली नागरीक उपस्थित होते.

जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात जिल्ह्यात ठीक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले. पोसरेतही सतरा जण मृत पावले. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौध्दवाडी येथेही डोंगर भागात गतवर्षी पडलेल्या भेगा होत्या. त्याठिकाणी एकुण 70 घरे आहेत आणि या भागातील डोंगराला काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. 2019 मध्ये या परिसरातील ज्या ठिकाणी भेगा पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी काही प्रमाणात जमीन खचली आहे. तसेच काही ठिकाणी भेगांचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. या धोकादायक ठिकाणी 9 कुटुंब आहेत. त्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या कुटुंबाचे राहण्याची व्यवस्था नाही, त्यांची जवळच्या शाळेत व्यवस्था करण्यात येईल असे सबंधीतांना सांगण्यात आले आहे. या खचलेल्या भागा पासून काही अंतरावर चिंद्रवली येथील रेल्वे बोगद्याच्या वरच्या डोंगर भागात काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. त्याची सुध्दा पाहणी करण्यात आली. या भागात असणारा रेल्वे बोगदा आणि महावितरणचे मोठे टॉवर आहेत. बोगद्या जवळील भाग धोकादायक असल्यामुळे संबंधित प्रशासनाला याबाबतच्या सूचना तलाठी श्री. सुळ यांनी लेखी कळविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT