esakal | पोलिस दलातील 66 पदांसाठी लवकरच भरती ; जाणून घ्या महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Police recruitment

पोलिस दलातील ६६ रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या अर्जांवर लवकरच पोलिस भरती होणार आहे.

पोलिस दलातील 66 पदांसाठी लवकरच भरती

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : पोलिस दलातील ६६ रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या अर्जांवर लवकरच पोलिस भरती होणार आहे. एका खासगी एजन्सीद्वारे ही प्रक्रिया होणार आहे. मात्र त्यावर पोलिस दलाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे. यामध्ये अनेक उमेदवारांच्या मेल आयडी, पासवर्ड बदलण्यास तसेच एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांना राखीव (खुला) किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक पर्याय निवडायची संधी आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या वेबसाइटला जाऊन पासवर्ड व प्रवर्ग बदलाची प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस उपअधीक्षक (गृह) एस. एल. पाटील यांनी दिली.ऑनलाइन झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, आगामी काळात लवकरच जिल्ह्यात पोलिस भरती होणार आहे. २०१९ मध्ये ६६ पदांसाठी जे उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावर ही भरती प्रक्रिया होणार आहे; मात्र त्याची तारीख अजून स्पष्ट झालेली नाही. उमेदवारांच्या संपर्कात राहाता यावे, शासनाचे नवे धोरण त्यांना समजावे यासाठी पोलिस दलाचा हा प्रयत्न आहे. एकूण ६६ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामध्ये ३ पदे पोलिस बॅंडस्मन (शैक्षणिक पात्रता १० पास), ४४ पदे चालक पदासाठी (लायसन आणि १२ वी पास) तर इतर पदे शिपाई पदासाठी (१२वी पास) आहेत. अनेक उमेदवार मेल आयडी विसले आहेत, काही पासवर्ड विसले आहेत त्यांना वेबसाइटला जाऊन ती दुरुस्ती करता येणार आहे.

हेही वाचा: भरतीसाठी उंचीची युक्ती आली अंगलट ; दोन तरूणांचे पितळ उघड

एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांना राखीव (खुला) किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक पर्याय निवडायची संधी आहे. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांच्या काही शंका असतील तर ०२३५२-२२२२२२-२७१२५७ या नंबवर संपर्क साधायचा आहे. उमेदवारांचे अर्ज गोळा करण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे होती. त्यामुळे एकूण किती उमेदवारी अर्ज आले हे सांगू शकत नाही; मात्र मोठ्या प्रमाणात अर्ज आहेत. नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच वयोमर्यादा संपत आलेल्या उमेदवारांचाही विचार होण्याची शक्यता आहे, असे पाटील म्हणाले.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती; मात्र या वेळी पहिल्यांदा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होईल त्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. खासगी संस्थेवर या प्रक्रियेची जबाबदारी असली तरी त्यावर आमचे पोलिस दलाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top