covid 19 impact on marleshwar festival stopped in sadavali ratnagiri 
कोकण

मार्लेश्वर यात्रोत्सव रद्द: केवळ धार्मिक विधी होणार, भाविकांना बंदी

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी): अखंड महाराष्ट्रातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती मार्लेश्वर देवस्थानचे ट्रस्टी सुनील लिंगायत, गिरिजा देवीचे मानकरी बापू शेट्ये, काका शेट्ये,  सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रकाश शिंदे,संतोष लाड,नगरसेवक प्रफुल्ल भुवड उपस्थित होते.

संपुर्ण महाराष्र्टात मार्लेश्वर देवस्थान प्रसिद्घ आहे.संक्रांतीला होणारा कल्याणविधी सोहळा म्हणजे देवाच्या लग्नाला लाखो भाविक वर्‍हाडी म्हणुन उपस्थित रहात असतात.यंदा माञ हे चिञ पहायला मिळणार नसुन शिवहरा शिवहराचा गजर सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणार नाही. यावर्षी यात्रोत्सव होणार नसून केवळ धार्मिक विधी ते ही मानकरी आणि निवडक लोंकांच्या उपस्थितीत होणार आहेत. यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा- एक तास गरमागरम चर्चा झाल्यावर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवकांनी मांडला ठराव
 
जादा एस टी फेऱ्या किंवा अन्य खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत मार्लेश्वरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.  तशी कल्पना त्यांना देण्यात येणार आहे. याची दखल घेऊन भाविकांनी मार्लेश्वरला येउ नये आणि विनाकारण गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.बैठकीत पोलिस उपनिरिक्षक बाइंग आणि किशोर जोशी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी साखरपा, देवरुख, मारळ, आंगवली येथील मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT