leopard sakal
कोकण

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जिवदान

विहिरीत पडलेले बिबट्याला वन विभागाने जिवदान दिले. काल रात्री अडीच तास हा बच्यावकार्याचा थरार सुरू होता

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : हरपुटे (ता. संगमेश्वर) येथे विहिरीत पडलेले बिबट्याला वन विभागाने जिवदान दिले. काल रात्री अडीच तास हा बच्यावकार्याचा थरार सुरू होता. बिबट्याला सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.

संगमेश्वर येथे दत्ताराम दाजी कांबळे (रा.मौ. हरपुडे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांच्या घराच्या मागच्या बाजूस विहिर आहे. काल मध्ये रात्री 9.30 वा. सुमारास बिबट्या पडल्याची बातमी ग्रामस्थांनी भ्रमणध्वनी वरून वनपाल संगमेश्वर (देवरुख) यांनी रात्री 11 वाजता च्या सुमारास दिली. त्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी व स्टाफ घटना स्थळी पोहोचुन वस्तुस्थितीची पाहणी केली. बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले.विहिरी मध्ये पिंजरा सोडून रात्री 1.30 वा. बिबट्यास पिंजऱ्यात घेतले.

पशु वैद्यकीय अधिकारी संगमेश्वर यांचे कडून तपासणी करून बिबट्या सुखरूप असल्याची खात्री करून सदर बिबट्यास सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पुढील तपास चालू आहे. सदर कार्यवाही ही मा. विभागीय वन अधिकारी (प्रा.)रत्नागिरी (चिपळूण) दि.पो. खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.)रत्नागिरी (चिपळूण) स. बा. निलख यांचे मार्गदशानाखाली परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी,श्रीम. प्रियंका पंढरीनाथ लगड, वनरक्षक साखरपा श्री. न्हानु गावडे, वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा श्री. संजय रणधीर,वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा श्री. राहुल गुंठे यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT