ढोलकीच्या आवाजाने गणेशोत्सवाची चाहूल

गणेशोत्सवात आरतीमध्ये रंगत आणणारी ढोलकीची मजा काही वेगळीच असते.
Dholki
Dholkisakal
Updated on

तळा : काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्याची सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. या गणेशोत्सवात आरतीमध्ये रंगत आणणारी ढोलकीची मजा काही वेगळीच असते. हीच ढोलकी सध्या खांद्याला अडकवून विक्रेते तळा शहरात फिरत आहेत. ढोलकी वाजवत ते फिरत असल्याने त्याचा आवाज कानावर येताच गणेशोत्सवाची चाहूल अनेकांना लागत आहे.

कोकणात गणपतीच्या सणाला अत्यंत महत्त्व आहे. या गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर शहरातून खांद्याला ढोलक्या अडकवून त्या विक्रीसाठी फिरणारे कारागिर दिसू लागतात. गाव शहरातून ढोलकी वाजवत फिरणाऱ्या या कारागिरांच्या ढोलकीचा आवाज कानावर पडला की, आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणपतीच्या आरतीवेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो. तो कानावर पडला की, आरतीलाही रंगत भरली जाते.

Dholki
इंग्रजांनीही जाणली होती मराठ्यांची ताकद ; छत्रपतींच्या राज्यातही गाजवले कर्तृत्व 

आरतीसोबतच भजनासाठी, तसेच पारंपरिक गाणी वाजवण्यासाठीही होतो. त्यामुळे गणेशोत्सवात ढोलकीला मोठी मागणी असते. सध्या तळा तालुक्यात ढोलकी विक्रीला सुरुवात झाली आहे. मोकळ खोड, शेळीचे चामडे, चाव्या, पॉलिश, शाई आणि दोरी व वादी आदी साहित्य वापरून या ढोलकीची बांधणी केली जाते. विक्रेते १० ते १५ ढोलक्या खांद्याला अडकवून तळा बाजारपेठेत विकत आहेत. या ढोलक्या ३०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Driver’s Presence of Mind Prevents Disaster as ST Bus Nearly Overturns in Pali
Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Marathi News Esakal
www.esakal.com