nitesh rane criticism to aaditya thackeray Esakal
कोकण

Kokan: आदित्य ठाकरेंना बॉलीवूडच्या लोकांसोबत पार्टी करायची आहे; नीतेश राणेंची टिका

aditya Thackeray: खळा बैठका हा बहाणा

सकाळ डिजिटल टीम

Aditya Thackeray Kokan Daura: गोव्यात फिल्‍म फेस्टीव्हल सुरू आहे. तेथे सिने कलाकारांसोबत नाचण्यासाठी आदित्‍य ठाकरे येत आहेत. त्‍यामुळे ठाकरेंच्या सिंधुदुर्गातील खळा बैठका हा निव्वळ बहाणा आहे.

ठाकरेंचे खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर प्रेम आहे की, बॉलीवूडच्या लोकांसोबत त्‍यांना पार्टी करायची आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली.

ते म्‍हणाले, ‘‘आदित्‍य ठाकरे यांचा गोवा कोकण दौरा आणि गोव्यात सुरू असलेला फिल्‍म फेस्टिव्हल यामध्ये काहीतरी साम्‍य असल्‍याचे दिसत आहे.

ठाकरेंचे खरंच सिंधुदुर्गवर प्रेम आहे की गोव्यातील फिल्‍म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावून बॉलीवूड लोकांसोबत त्‍यांना पार्टी करायची आहे. ज्‍यांची संघटना खिळखिळी झाली त्‍यांना आता खळा बैठकी शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.’’

राणे पुढे म्‍हणाले, ‘‘एक दिवसीय जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. या मुद्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘पनवती’ हा शब्‍द वापरला; पण १९ नोव्हेंबरला तर इंदिरा गांधी यांची जयंती होती. त्‍यादिवशी भारत जिंकायला हवा होता.

त्‍यामुळे ‘पनवती’ शब्द बोलताना त्‍यांनी भान ठेवावे. अंतिम सामना हरल्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले. एक नेता कसा असावा याचा आदर्श त्‍यांनी घालून दिला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT