vinayak raut rane  sakal
कोकण

Kokan: सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही; राऊतांची राणेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

Vinayak Raut: सत्तेसाठी लाचारी व अति करणाऱ्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही. सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांनी आमचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना शहानपणा शिकविण्याच्या भानगडीत पडू नये, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्यावर केली.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्यावर आमदार राणे यांनी टीका केली होती. त्याला आज येथे खासदार राऊत यांनी प्रत्युतर दिले. ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे अजमेर दर्ग्यात पाया पडले, असे वक्तव्य राणे यांनी केले आहे; मात्र नीतेश राणे नांदगाव दर्ग्यात पाया पडतात त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठे जाते? केवळ मतांसाठी लाचारी पत्करणारे हे आहेत.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘नौदल दिन सोहळ्याप्रसंगी मच्छीमारी व्यवसाय बंद राहणार आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होणार आहे. त्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. नौदल दिन सोहळ्यामुळे राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जात आहे, त्याबद्दल शासनाचे आभार.

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदीराची डागडुजी करावी. मंदिरातील मूर्ती सुवर्णमुद्रित करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र मायनाक भंडारी यांचे स्मारक करावे या प्रमुख तीन मागण्या पंतप्रधान व नौदल प्रमुख यांच्याकडे केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT