maharashtra budget Medical college to be set up in Sindhudurg kokan marathi news 
कोकण

Maharashtra Budget 2021: सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजसाठी अर्थसंकल्पीय तरतूद

सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आता पूर्णत्वास येणार आहे. राज्य शासनाने  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार  यांनी  आज मांडलेल्या अर्थसंकल्पात सभागृहात सादर करत असताना सिंधुदुर्ग येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे या ठिकाणच्या वैद्यकीय सुविधेत भर पडणार आहे. 

शासना मार्फत आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.  राज्यातील अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय महाविद्यालया प्रमाणे कोकणामध्ये ही वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. गेली अनेक वर्ष निवडणुकीत  या विषयाची वारंवार घोषणा होत होती. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचे  स्वप्नच राहिले होते.


 आघाडी सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय देताना या ठिकाणी एमबीबीएस कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय सुविधेत या महाविद्यालयांनी आणखीन भर पडणार आहे. त्याचबरोबर कोकणातील विद्यार्थ्यांना आता आपल्या जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT