कोकण

खळबळजनक! म्हाप्रळ खाडीत दिसले सशस्त्र अतिरेकी?

सचिन माळी.

अतिशय गंभीर व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या विषयासंदर्भात जिल्हा पोलिस दलाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मंडणगड : सावित्री खाडी पात्रात म्हाप्रळ या ठिकाणी सशस्त्र अतिरेकी पाहिल्याच्या वृत्तामुळे रविवार (3) ऑक्टोंबर 2021 रोजी रात्रीनंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा चांगलीच हाय अलर्टवर दिसून आली. दरम्यान तपासाअंती निराधार ठरलेल्या या वृत्तानंतरही खबरदाराची उपाययोजना म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ स्तरावरील पोलिस अधिकाऱ्यांचा मंडणगडमध्ये फौजफाटा आला. अतिशय गंभीर व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या विषयासंदर्भात जिल्हा पोलिस दलाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

रविवारी रात्रीनंतर या संदर्भातील घडामोडींना वेग आल्याचे दिसून आले. हत्यारबंद नऊ माणसांनी भरलेली बोट म्हाप्रळ आंबेत पूलाखालून खाडीमार्गे पास झाल्याची माहीती पोलिस दलापर्यंत पोहच झाल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या वृतामधील सत्य असत्यता पडताळण्यासाठी पोलिस दल कार्यरत झाले दिसून आले. तालुक्यातील चेक नाक्यासह सागरी सिमांवरही बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र अशा प्रकारे माणसांनी भरलेली कोणतीही बोट पोलिस दलास दिसून आली नाही. याचबरोबर संशयितांची पडताळणी असून या संदर्भात स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस अधिक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रीया देण्यास टाळले. यामुळे मंडणगडात पडद्यामागे बऱ्याच नाट्यमय घडामोडी होताना दिसून आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

Akole News: महिना उलटला तरी पुस्तकं मिळेनात! अकोलेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण समिती अध्यक्षांचा तीव्र संताप

Commonwealth Games 2026 स्पर्धेत क्रिकेटसह कुस्ती, बॅटमिंटनचा समावेश का केलेला नाही? कारण घ्या जाणून

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

SCROLL FOR NEXT