esakal | Nobel Prize 2021: वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर, 'हे' आहेत मानकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Nobel Prize: वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर, 'हे' आहेत मानकरी

Nobel Prize: वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर, 'हे' आहेत मानकरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

स्टॉकहोम - शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापौटियन यांना त्यांच्या शोधांसाठी संयुक्तपणे देण्यात आले आहे. तापमान आणि स्पर्शाच्या रिसेप्टर संदर्भातील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.

उष्णता, थंडावा आणि स्पर्श जाणण्याची आपली क्षमता जगण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या सभोवतालच्या जगाशी आपला संवाद साधण्यासाठी ही वैशिष्ट्ये मदत करतात.आपल्या दैनंदिन जीवनात आपण या संवेदनांना गृहीत धरतो, परंतु आपल्या शरीरातील हे तंत्रिका आवेग कसे सुरू केले जातात. जेणेकरून तापमान आणि दाब जाणता येईल? या वर्षीच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांनी हा प्रश्न सोडवला आहे, असे नोबेल समितीने एका निवेदनात म्हटले आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात कार्यरत प्राध्यापक ज्युलियस आणि कॅलिफोर्नियामधील स्क्रिप्स रिसर्चचे प्राध्यापक पटापौटियन यांना एक कोटी स्वीडिश क्रोनर ( १.१ दशलक्ष डॉलर) एवढी रक्कम नोबेल पारितोषिकासोबत मिळेल.

नोबेल फाउंडेशनकडून स्वीडनचे वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ १९०१ पासून हा पुरस्कार दिला जातो. शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात हा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराचे स्वरुप प्रशस्तीपत्र आणि दहा लाख डॉलर रक्कम अशी असते.

अल्फ्रेड नोबेल कोण?

अल्फ्रेड नोबेल यांनी एकूण ३५५ शोध लावले. ज्यामध्ये डायनामाइटच्या शोधाचासुद्धा समावेश आहे. १८९६ मध्ये मृत्यूच्या आधी आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मालमत्तेतील मोठा वाटा ट्रस्टला दिला. त्यांची इच्छा होती की, या पैशांच्या व्याजातून दरवर्षी अशा लोकांचा गौरव करावा ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी काम केले.

loading image
go to top