Instagram Friendship esakal
कोकण

Instagram वरील मैत्रीतून अल्पवयीन मुलगी दिल्लीतून पोहोचली वेंगुर्लेत; पोलिसांनी जावेदला केली अटक

इन्स्टाग्रामवर (Instagram) झालेल्या मैत्रीतून दिल्लीतील अल्पवयीन मुलगी थेट येथे आपल्या मित्राकडे राहायला आली.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक येथे दाखल होत संशयित जावेद मकानदार (वय ३६, रा. वेंगुर्ले, पिराचा दर्गा) याला ताब्यात घेतले.

वेंगुर्ले : इन्स्टाग्रामवर (Instagram) झालेल्या मैत्रीतून दिल्लीतील अल्पवयीन मुलगी थेट येथे आपल्या मित्राकडे राहायला आली. या प्रकाराने पोलिसही चक्रावले. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर येथील पोलिसांनी तिला ताब्यात घेत एका निवारा केंद्रात ठेवले.

यानंतर दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक येथे दाखल होत संशयित जावेद मकानदार (वय ३६, रा. वेंगुर्ले, पिराचा दर्गा) याला ताब्यात घेतले. संबंधित अल्पवयीन मुलगी नवी दिल्लीतील आहे. तिची वेंगुर्लेतील एका ३६ वर्षीय तरुणाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली.

यातून ती त्याच्याकडे राहण्यासाठी थेट वेंगुर्लेत पोहोचली. तिच्या नातेवाइकांनी नॉर्थ वेस्ट, दिल्ली जहांगीरपुरी येथील पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली. दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला.

यावेळी ती वेंगुर्लेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी येथील पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी संबंधितांकडे चौकशी केली. यानंतर खात्री पटल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

म्युच्युअल फंड : आर्थिक उद्दिष्टे आणि लाइफ सायकल फंड

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत येणार? तोडगा निघण्याची शक्यता!

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

SCROLL FOR NEXT