कोकण

कुडाळ - आमदार वैभव नाईक यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल

सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले

सकाळ डिजिटल टीम

कुडाळ : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पेट्रोल पंपवर १०० रुपयांत प्रति वाहन दोन लिटर पेट्रोल तर भाजप सदस्यांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याला १ लिटर मोफत पेट्रोल देणार असल्याचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काल ११ वाजच्या सुमारास आमदार वैभव नाईक व त्याचे कार्यकर्ते भारत पेट्रोल पंपवर आल्यानंतर भाजप सेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

वातावरण तंग झाले. मात्र यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ पोलिस स्थानकांत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १४१, १४३, १४९, १८८, २६९, २७० या कलम अंतर्गत शिवसेनेचे आमदार वैभव नाईकसह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT