Osargaon Toll Plaza esakal
कोकण

'मनसे'च्या आंदोलनाची धास्ती; मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाक्‍यावर कडक बंदोबस्त; तब्‍बल 50 पोलिस तैनात

सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाच पोलिस अधिकाऱ्यांसह तब्‍बल पन्नास पोलिसांनी टोल नाक्‍यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

कणकवली : गेल्‍या दोन दिवसांत मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी हातीवले टोल नाका व पाली खानूमधील महामार्ग ठेकेदाराचे कार्यालय फोडले. यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी सतर्कता बाळगून ओसरगाव टोल नाक्‍याला (Osargaon Toll Plaza) संरक्षण दिले आहे.

पाच पोलिस अधिकाऱ्यांसह तब्‍बल पन्नास पोलिसांनी टोल नाक्‍यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. पनवेल येथे बुधवारी (ता. १६) मनसेचा निर्धार मेळावा झाला. यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई-गोवा महामार्ग रस्त्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्‍त केली होती.

ठाकरेंच्या भाषणानंतर आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी हातीवले टोल नाक्‍याची तोडफोड केली. त्‍यानंतर पाली खानू येथील महामार्ग ठेकेदाराचे कार्यालय देखील फोडले. दरम्यान, ओसरगाव टोल नाक्‍यावर काल सकाळपासून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

एक पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह राखीव दलाची एक तुकडी आणि इतर पोलिस असा पन्नास जणांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्‍यान, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही सायंकाळी ओसरगाव टोल नाक्‍याला भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

टोलनाका नेहमीच वादाचा मुद्दा

सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. येथे दोन वेळा टोल वसुली सुरू करण्यात आली; मात्र सर्वपक्षीय आंदोलनानंतर ती थांबविण्यात आली. आता मनसे आंदोलनाची ओसरगाव टोल नाक्‍यावर पुनरावृत्ती टाळण्यासाठी सिंधुदुर्गची पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT