Neelima Chavan Case : नीलिमाचा घात की अपघात? समोर आली मोठी अपडेट; तब्बल 18 दिवसांनी उलगडा, पोलिसांना मोठं यश

मृतदेह सापडलेल्या निलिमा चव्हाणचा घातपातच झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
Neelima Chavan Death Case
Neelima Chavan Death Caseesakal
Summary

दाभोळ खाडीमध्ये १ ऑगस्ट २०२३ रोजी नीलिमा चव्हाणचा मृतदेह सापडला. अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.

रत्नागिरी : घातपाताच्या संशयावरून उभा राहिलेला जनरेटा पोलिसांनी अगदी शांतपणे दबावाला न जुमानता तपासाला दिशा देत नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा (Neelima Chavan Death Case) १८ दिवसांत उलगडा केला. समाज, स्थानिक एक झाले.

पोलिसांच्या तपासावरही बोट दाखवत सीबीआयकडं (CBI) हा तपास देण्याची मागणी झाली, तरी पोलिस या मृत्यू प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले. बँकेतील कामाच्या प्रचंड तणाव आणि दबावामुळं आत्महत्या करण्यास भाग पडल्याचं निष्पन्न झाल्यामुळं पोलिसांनी बँकेच्या प्रकल्प व्यवस्थापकास अटक केली.

Neelima Chavan Death Case
नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला अटक, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता!

पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. दाभोळ खाडीमध्ये १ ऑगस्ट २०२३ रोजी नीलिमा चव्हाणचा मृतदेह सापडला. अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु, अचानक बेपत्ता होऊन काही दिवसात मृतदेह सापडलेल्या निलिमा चव्हाणचा घातपातच झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

अतिशय क्रूरपणे तिचा घात केल्याची चर्चा सुरू झाली. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर नीलिमाचा व्हिसेरा राखून ठेवून तो तपासणीसाठी पाठवण्यात आला. तपास लागत नसल्याने नाभिक समाज एक झाला. त्यांनी बंदची हाक दिली, तसेच स्थानिकांनी कॅण्डल मार्च काढल्यामुळं हे प्रकरण अधिकच गंभीर झाले. पोलिसदलावर प्रचंड दबाव येऊ लागला; परंतु पोलिस दबावाला बळी न पडता त्यांनी योग्य दिशेने तपास सुरू केला.

Neelima Chavan Death Case
G Parameshwar : काँग्रेस सरकार 5 वर्षे टिकणार, भाजपचेच काही आमदार आमच्या संपर्कात; गृहमंत्र्यांचा मोठा दावा

पोलिस तपास सुरू असताना १७ ऑक्टोबरला चिपळूण पोलिस (Chiplun Police) ठाणे येथून दाभोळ पोलिस ठाण्यात कलम ३०६ अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

मुलगी दापोली येथील ज्या बँकेमध्ये काम करत हो,ती त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड (मूळ रा. कोल्हापूर) याला दैनंदिन कामकाजाबाबत अहवाल द्यावा लागत असे व ऑफिसमध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड नेहमी १५ दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता.

Neelima Chavan Death Case
D.Ed-B.Ed धारकांसाठी आनंदाची बातमी! राज्यात तब्बल 10 हजार शिक्षकांची होणार भरती; सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी संग्राम सुरेश गायकवाड (वय २६, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याला अटक केली. पोलिसांनी १८ दिवसांमध्ये या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन वस्तुस्थिती पुढे आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com