Press conference of Sawantwadi Mayor regarding the statue of Shivaji Maharaj 
कोकण

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणाले...

रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरात मोती तलावाच्या मध्यभागी तुतारी जवळ केशवसुत कट्ट्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. राजघराण्याची त्यासाठी पुर्वपरवानगी मिळाली आहे, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

येथील मोती तलावाच्या केशवसुत कट्ट्यावर तुतारी जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली परवानगी येथील संस्थानच्या राजघराण्याने दिली आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राजघराण्याची भेट घेतली होती. त्यावेळी श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी कळवितो, असे सांगितले होते, असे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले. याबाबत राजेसाहेब यांनी आमदार नितेश राणे यांना फोन करून कळवले आहे. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्ष परब यांनी राजघराण्याचे आभार मानले आहेत. 

याबाबतची पत्रकार परिषद घेऊन श्री.परब यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ""याबाबत चार दिवसापूर्वी आमदार राणे यांनी राजवाड्यात जाऊन राजकारण्याची भेट घेतली होती. यावेळी आपला निर्णय काही दिवसात कळवू, असे आश्‍वासन त्यांच्याकडून देण्यात आले होते. यासंदर्भात काल (ता.19) राजकारण्यांकडून श्री. राणे यांना संपर्क साधून त्या ठिकाणी पुतळा होण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचे कळविले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही.''

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, दिपाली भालेकर, नासिर शेख, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT