कोकण

माणगाव वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार

CD

90126
गोवेरी ः आनंद वैद्य यांच्याकडून सन्मान स्वीकारताना वाचनालयाच्या उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर. सोबत माजी अध्यक्ष विजय पालकर, ग्रंथपाल प्रज्ञा कविटकर, संचालक शाम पावसकर आदी.

माणगाव वाचनालयास
आदर्श ग्रंथालय पुरस्कार
माणगाव ः श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयास जिल्हा ग्रंथालयाचा आदर्श ग्रंथालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन गोवेरी (ता. कुडाळ) येथे ज्ञानदीप वाचनालयात जिल्हाध्यक्ष आनंद वैद्य यांचे अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमात श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाने गेली चार दशकांहून अधिक काळ केलेल्या कामाची नोंद घेऊन यावर्षीचा आदर्श ग्रंथालय पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर कोकण विभागीय ग्रंथालय अध्यक्ष मंगेश मसके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, जिल्हा ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
...............
सावंतवाडीत २६ ला क्रीडा महोत्सव
बांदा ः नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन २६ मार्चला केले आहे. सर्व स्पर्धा सावंतवाडी येथे यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या भव्य क्रीडांगणावर होणार आहेत. या क्रीडा महोत्सवात सावंतवाडी तालुक्यातील सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे. तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, १०० मीटर धावणे आणि व्हॉलीबॉल हे खेळ असतील. विजयी खेळाडूंना भारत सरकारच्या खेलमंत्रालयाचे प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहेत. यासाठी स्पर्धकांची मोफत नोंदणी स्पर्धेच्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी आठ ते साडेनऊ दरम्यान होणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अजिंक्य शिंदे, प्रथमेश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Election Result: ओडिशामध्ये भाजपला मिळालं बहुमत

India Lok Sabha Election Results Live : भाजपला मोठा धक्का! इंडिया आघाडीवर... सेन्सेक्स 4000 अंकांनी घसरला

Maharashtra Lok Sabha Election Results Live : पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा 40780 मताने आघाडीवर, तर ठाकरे गटाच्या भारती कामडी पिछाडीवर

पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : मोदींची गॅरंटी, मंगळसूत्र, टेम्पो आणि बरंच काही...; यंदाची लोकसभा याच मुद्द्यांवर गाजली!

SCROLL FOR NEXT