Ratnagiri Loksabha Constituency Ramdas Kadam esakal
कोकण

शिवसेनेची 'ती' जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडली जाणार नाही; रामदास कदमांनी कोणत्या जागेवर केलाय दावा?

कोकणातील राजकारण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

'प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे; पण भाजप रायगडमध्ये पण आम्ही, रत्नागिरीमध्ये पण आम्ही असे म्हणत असेल, तर ते योग्य नाही.'

खेड : आपण दोघे भाऊ भाऊ, तुझे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लाऊ... ही भाजपची (BJP) नीती बनली आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची (Ratnagiri Loksabha Constituency) जागा शिवसेनेची (Shiv Sena) आहे, ती कोणत्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे रायगड लोकसभा (Raigad LokSabha) मतदारसंघाचा भाग असलेल्या लोटे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यावेळी हजर होते. कोकणातील राजकारण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. शुक्रवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे येथे राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांच्यासोबत सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी सभेपूर्वी माध्यमांसोबत बोलताना रामदास कदम म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे; पण भाजप रायगडमध्ये पण आम्ही, रत्नागिरीमध्ये पण आम्ही असे म्हणत असेल, तर ते योग्य नाही. हे म्हणजे असे आहे आपण दोघे भाऊ भाऊ तुझे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लाऊ.

रायगडमध्ये तटकरे हे विद्यमान खासदार आहेत, तर रत्नागिरीत विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. सद्यस्थितीत जे रत्नागिरी- सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शेवटची सभा मी घेतली होती, अशी आठवण सांगत कदम म्हणाले, ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना रत्नागिरी मतदारसंघ सोडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : जुहूमध्ये अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर महापालिकेची मोठी कारवाई, अनधिकृत बांधकामाचे काही भाग पाडले

Crime News: श्रीरामनगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बारा तासाच्या आत चौघांना अटक

दोन थोबाडीत माराव्याश्या वाटत होत्या... ललित प्रभाकरला पहिल्यांदा कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

SCROLL FOR NEXT