Vashishti River esakal
कोकण

Vashishti River : विधीवत पूजा करत वाशिष्ठी नदीला नेसवणार साडी, पुराणकथांचं होणार वाचन; काय आहे नेमकं कारण?

खाडीसफर, मगर दर्शन सफर असे कार्यक्रम खाडीपात्रात पर्यटकांसाठी आयोजित केले आहेत.

मयुरेश पाटणकर

यापूर्वी वाशिष्ठी उगम ते संगम असा साहसी पर्यटनाला धरून असलेला उपक्रम झाला होता. त्या निमित्ताने जादुई प्रदेश पाहण्याची, निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी सर्वांना मिळाली.

गुहागर : मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यात माँ नर्मदाला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवली जाते. ठिकठिकाणी या वेळी नर्मदेच्या तीरावर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. असाच पहिला प्रयोग यंदा गुहागर (Guhagar) तालुक्यातील परचुरी येथे केला जाणार आहे. २२ मार्चला विधीवत वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्यात येणार आहे.

ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी परचुरीतील सत्यवान देर्देकर हा तरुण पर्यटन व्यावसायिक झपाटून कामाला लागला आहे. २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन २२ मार्चला वाशिष्ठी नदीचे (Vashishti River) पूजन आणि तिला साडी (Saree) नेसवण्याचा कार्यक्रम परचुरीमध्ये करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या जोडीला १८ ते २२ मार्च पाच दिवस वाशिष्ठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवामध्ये सत्यवान देर्देकर यांच्या हाऊसबोटीवर दररोज सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ३ ते ६ या मराठीतील भागवत पुराण व मत्स्यपुराण वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.

त्याचप्रमाणे खाडीसफर, मगर दर्शन सफर असे कार्यक्रम खाडीपात्रात पर्यटकांसाठी आयोजित केले आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ५० पर्यटकांना खाडी सफरीतून मगर दर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. ज्या पर्यटकांना पुराण कथा ऐकायच्या आहेत त्यांना हाऊसबोटवरील कथा वाचन कार्यक्रमातही सहभागी होता येणार आहे.

यापूर्वी वाशिष्ठी उगम ते संगम असा साहसी पर्यटनाला धरून असलेला उपक्रम झाला होता. त्या निमित्ताने जादुई प्रदेश पाहण्याची, निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी सर्वांना मिळाली. आता याच नदीचे पूजन आणि तिला साडी नेसवण्याचा अभिनव उपक्रम होतोय, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे खाडीकिनारी असलेल्या तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांनी असे उपक्रम यशस्वी केले पाहिजेत.

-धीरज वाटेकर, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PWD Engineer Assault : भाजप नेता अन् PWD इंजिनिअरची तूफान हाणामारी, चेहऱ्याला चिखलही फासला; लोक भांडण सोडवायला आले पण... VIDEO VIRAL

लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, २३६ कोटींच्या कमाईतून ३० हजार ड्रोन खरेदी करता येणार; झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Marathi News Live Updates : केदारनाथ यात्रेदरम्यान दगड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू , शेकडो यात्रेकरू अडकले

IND vs PAK: वर्ल्ड कप नाही, आशिया कपही नाही... तरी भारत-पाकिस्तान भिडणार? ICC घेणार ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे प्लॅन

ठाण्यात हिट अँड रनचा थरार! चालकाचा ब्रेक ऐवजी एक्सिलेटरवर पाय, ३-४ वाहनांना उडवत पादचारी महिलेला चिरडलं; एकाचा मृत्यू, दोन जखमी

SCROLL FOR NEXT