Best Tourism Village 2024 Competition
Best Tourism Village 2024 Competitionesakal

'बेस्ट टुरिझम व्हिलेज'मध्ये 'या' गावाची निवड; 126 ग्रामपंचायतींनी घेतला सहभाग, मुरूड बीचचं काय आहे वैशिष्ट्य?

रत्नागिरीत समुद्रकिनारी वसलेले कर्दे हे गाव (Karde Village) पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
Summary

केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे १२६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

हर्णै : केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण विभागाकडून (Environment Department) ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज २०२४’ या स्पर्धेत (Best Tourism Village 2024 Competition) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे या गावाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण झाली असून, दोन-तीन दिवसांत अंतिम फेरी होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत समुद्रकिनारी वसलेले कर्दे हे गाव (Karde Village) पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. स्वच्छ, समुद्रकिनारा, पांढरी वाळू हे या गावाचे खास वैशिष्ट्य आहे. बहुतांशी पर्यटक या ठिकाणी या बीचवर मज्जा करण्यासाठी आवर्जून येतात. त्यामुळे दापोली तालुक्यामध्ये मुरूड बीचला लागून असलेला कर्दे बीच प्रसिद्ध आहे.

Best Tourism Village 2024 Competition
Sumargad Fort : ऐतिहासिक किल्ले सुमारगड पुरातत्त्वकडून दुर्लक्षित; शिवभक्तांसह गावकऱ्यांचे प्रयत्न

केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे १२६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. आता या स्पर्धेत दोन ग्रामपंचायती (Gram Panchayat) महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या स्पर्धेंतर्गत कर्दे गावातील पर्यटन उद्योग, कृषी पर्यटन, आर्थिक सक्षमीकरण, महिलांचे सबलीकरण, जैवविविधता, उद्योग, दळणवळण, नैसर्गिक स्रोत वापरून केलेले जलव्यवस्थापन, परिसरातील सांस्कृतिक वातावरण, पर्यटन उद्योग आधारित रोजगार, सामाजिक जीवन आदींचा विचार करण्यात आला आहे.

Best Tourism Village 2024 Competition
देवदेवतांच्या नावाखाली 12,000 कोटींच्या घोटाळ्यासाठी शक्‍तिपीठ महामार्गाचा अट्टाहास; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

गावात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा वापर कशाप्रकारे करण्यात आला, याचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती सरपंच सचिन तोडणकर यांनी दिली. या गावाची राष्ट्रीय स्पर्धेत नोंद झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी गावाचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com