Ganjifa Art esakal
कोकण

'गंजिफा'सह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून 'जीआय' मानांकन; सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सावंतवाडीच्या राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले यांनी गंजिफा कलेला राजाश्रय दिला.

सकाळ डिजिटल टीम

लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने राजाश्रय दिल्यानंतर आता जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सावंतवाडी : येथील राजघराण्याच्या गंजिफा कलेसह सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना (Toys) भारत सरकारकडून जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. सद्यस्थितीत काही निवडक कलाकारांच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम भविष्यात लघू उद्योगात परिवर्तित करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सौ. शुभदादेवी भोसले (Shubdadevi Bhosale) यांनी दिली.

राजवाडा परिसरातील सभागृहात गंजिफा आर्ट असोसिएशन ऑफ सावंतवाडी संस्थानतर्फे (Ganjifa Art Association of Sawantwadi) राजघराण्याकडून, तर सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आनंद मेस्त्री व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. यावेळी राजे खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले, ॲड. समीक्षा दाभाडे आदी उपस्थित होते.

शुभदादेवी भोसले म्हणाल्या, ‘‘जीआय मानांकनासाठी (GI Rating) ॲड. दाभाडे यांनी नोव्हेंबर २०२२ ला प्रस्ताव सादर केला होता. सावंतवाडी लॅकर वेअर्स कंपनीच्या माध्यमातून पाठपुरावा झाला. त्यानंतर ६ जानेवारी २०२४ ला मानांकन जाहीर झाले. गंजिफा कलेला जी आय मानांकन प्राप्त झाल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.’’

सौ. श्रद्धाराणी भोसले म्हणाल्या, ‘‘सावंतवाडीच्या राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले यांनी गंजिफा कलेला राजाश्रय दिला. त्यानंतर सद्यस्थितीत २५ कलाकार ही कला वृद्धिंगत करीत आहेत. भविष्यात लघू उद्योगाच्या माध्यमातून १२५ कलाकारांना सोबत घेऊन काम करायचा मानस आहे. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून चांगले कार्य करीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील गंजिफा भेट देण्याचा मानस आहे.’’

युवराज भोसले म्हणाले, ‘‘गंजिफा ही पुरातन लोककला (Ganjifa Art) असून तो देव खेळ आहे. पुराणातील विष्णूचे दहा अवतार असलेल्या दशावतारांच्या कथांचा या गंजिफामध्ये समावेश आहे. रामायण, महाभारतातील कथाही पत्त्यांच्या माध्यमातून यात चित्रीत झाल्या आहेत. गंजिफा आज विकत घेतला जात असला तरीही तो प्रत्यक्षात कसा खेळला जातो, याबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे लवकरच राजवाड्यात गंजिफाची कार्यशाळा घेण्यात येईल. ‘यू ट्यूब’वर देखील गंजिफा खेळाविषयी माहिती व क्यूआर कोड देण्यात येणार आहे.’’

लाकडी खेळण्यासाठी आवश्यक असलेली कुड्याची व पंगाऱ्याची झाडे आता दुर्मिळ होत चालल्याने वखारींमधील टाकाऊ लाकडाचा वापर करून खेळणी बनविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे चीनच्या खेळण्यांपेक्षाही स्वस्त खेळणी आम्ही उपलब्ध करून देऊ शकणार आहोत. लाकडी खेळणी म्हणजे चितारआळी हे समीकरण झाले असले, तरीही भविष्यात चितारी व सुतार बांधव एकत्र येऊन यासाठी काम करणार असल्याचे सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने राजाश्रय दिल्यानंतर आता जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे लाकडी खेळण्यांच्या जीआय मानांकनसाठी सहकार्य करणाऱ्या राजघराण्याचे सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या संस्थेचे आनंद मेस्त्री यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश मेस्त्री, महेश सुतार, गुरुनाथ मेस्त्री, दशरथ मेस्त्री, महादेव मेस्त्री, प्रशांत मेस्त्री, नारायण मेस्त्री, विष्णू मेस्त्री, जयवंत मेस्त्री, नंदकिशोर मेस्त्री, सुनील मेस्त्री, राजू मेस्त्री व सोमा मेस्त्री आदी उपस्थित होते.

गंजिफा म्युझियम उभारण्याचा मानस

(कै.) शिवरामराजेंनी जर्मनी येथे भारताचे प्रतिनिधित्व करताना गंजिफा कलेला प्रोत्साहन दिले होते. जपान, जर्मनीमध्ये ‘प्लेईंग कार्ड म्युझियम’ आहेत. त्या धर्तीवर आपल्याकडेही अशा प्रकारचे संग्रहालय व्हावे, ही राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले यांची इच्छा होती. तीही लवकरच पूर्णत्वास आणणार असून सावंतवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘गंजिफा म्युझियम’ उभारू, अशी माहिती युवराज लखमराजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT