Parshuram Ghat Chiplun
Parshuram Ghat Chiplunesakal

Mumbai-Goa Highway : कशेडी-परशुराम घाटात वाढले 'ब्लॅक स्पॉट'; आतापर्यंत 11 अपघात, 'इतक्या' जणांनी गमावला जीव

कशेडी ते परशुराम घाट या ४४ किमीच्या अंतरावर एकूण ११ ब्लॅक स्पॉट असल्याचे प्रशासनाने या आधीच सांगितले होते.
Summary

आता महामार्गावरील सात ब्लॅक स्पॉटपैकी भरणे येथील जगबुडी नदीवरचा पूल आणि जोड रस्ता अपघातांचा नवीन स्पॉट झाला आहे.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) कशेडी ते परशुराम घाट या टप्प्यात असणाऱ्या सात ब्लॅक स्पॉटमध्ये (Black Spot) आता आणखी अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची वाढ झाली आहे. महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील (Jagbudi River) नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आणि तीव्र उतार, वक्राकार रस्त्यांमुळे गेल्या काही महिन्यात ११ हून अधिक भीषण अपघात झाले आहे.

यामध्ये पाचहून अधिकजणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढच झाल्याचे पुढे येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर अपघात कमी होतील, अशी अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र महामार्गाचे काम विचित्र पद्धतीने झाल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आता महामार्गावरील सात ब्लॅक स्पॉटपैकी भरणे येथील जगबुडी नदीवरचा पूल आणि जोड रस्ता अपघातांचा नवीन स्पॉट झाला आहे.

Parshuram Ghat Chiplun
Kolhapur Lok Sabha : 'राज्यात महायुतीचे 45, तर देशात NDA चे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील' - शंभूराज देसाई

कशेडी ते परशुराम घाट या ४४ किमीच्या अंतरावर एकूण ११ ब्लॅक स्पॉट असल्याचे प्रशासनाने या आधीच सांगितले होते. येथील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाच्या वतीने प्रयत्नदेखील करण्यात आले. भोस्ते घाटातील अवघड वळणावर होणाऱ्या सततच्या अपघातामुळे त्या ठिकाणी १५ मोठे गतिरोधक टाकण्यात आले. संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर एकाच ठिकाणी टाकण्यात आलेले हे गतिरोधक एकमेव उदाहरण आहे.

Parshuram Ghat Chiplun
'..जर मिठाचा खडा पडला, तर कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही'; अजितदादांच्या भाषणाचा स्टेटस् ठेऊन सामंतांचा कोणाला इशारा?

ब्लास्टिंग करून निर्माण झालेल्या खड्ड्यात सतत अवजड वाहने पडून व उलटून होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणी लोखंडी रेलिंग लावून त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सूचना फलकही लावण्यात आला आहे. त्याचबरोबर बोरघर खवटी आणि कशेडी घाटातील अवघड वळण आणि अन्य तीन ठिकाणी या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. त्या ठिकाणी गती मर्यादेचे फलकही उभे केले आहेत. तरीही अपघाताची संख्या वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com