कोकण

महावितरणची थकबाकी वसुलीत भरारी

CD

३७ ( पान ३ )
-----------
rat२६p३१.jpg -
२४M८००१०
गुहागर महावितरणची वसुली यशस्वीतेबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान.

गुहागर महावितरणची वसुलीत भरारी

शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण ; कर्मचाऱ्यांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : ग्राहकांना उत्तम सेवा देणे व वीज महसूल वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून यश मिळवल्याबद्दल गुहागर महावितरण उपविभागीय कार्यालयअंतर्गत वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सलग दोन वर्षे गुहागर तालुक्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक थकबाकी शून्य झाली असून, विशेषकरून अशोक मोहिते यांनी यशस्वी प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून ही वसुली मोहीम राबवली. शाखा अभियंता कलशेट्टी, शिंदे, अल्विन, यादव मॅडम, बिलिंग प्रमुख आखाडे लाईनमन तसेच लाईनस्टाफ यांचे या कामी योगदान लाभले.
गुहागर तालुक्यात १ मार्चपासून वसुलीला सुरवात झाली होती. पालशेत विभागातील मुसलोंडी, वाडदई, शृंगारतळी विभागातील वाकी-पिंपळवट, वेळंब-पांगारी व किरवलेवाडी, आबलोली विभागात गोणबरेवाडी, मोहितेवाडी, आंबेरखुर्द या गावांमध्ये वसुलीचे उद्दिष्ट मार्चमध्येच पूर्ण झाले होते. वास्तविक या वसुलीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली होती. उर्वरित गावांमध्ये वसुली मोहीम अशोक मोहिते आणि कर्मचाऱ्यांनी सुरू केली होती. अखेर हे वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, मोहिते यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी या वसुलीचे श्रेय अशोक मोहिते यांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT