कोकण

क्राईम

CD

४६ (पान ३ साठी)

भरणेत चोरट्याला
रंगेहाथ पकडले

खेड ः खेड-भरणे मार्गावरील आठवडा बाजारात दुकानात खरेदीचे पैसे देताना भंगार गोळा करणाऱ्याने २० हजार रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरी करत असताना फिर्यादी यांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हिरासिंग राठोड असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.४) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संयाजी बापू गायकवाड हे बाजार खरेदी करत असताना त्यांच्या बॅगेत २० हजार एवढी रक्कम होती. गर्दीचा फायदा घेत संशयित ती रक्कम बॅगेतून काढून स्वतःच्या पिशवीत भरत असताना पैशाचा बंडल खाली पडला व ते आजुबाजूच्या लोकांनी बघून त्याला पकडले. फिर्यादी गायवाड यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी चोरट्याला खेड पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.
--------

कोंढेतडमधील अपघात;
कंटेनरचालकावर गुन्हा

राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील कोंढेतड गाडगीळवाडी येथे कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना धडक दिली. ट्रकचालक अंबालाल श्रीरामजी भट (रा. उदयपूर, राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.५) सायंकाळी घडली होती. कोंढेतड गाडगीळवाडी येथे भरधाव कंटेनर महामार्गावर उलटला. अपघात होण्यापूर्वी या कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि एका चारचाकीलाही धडक दिली होती. त्यामध्ये सहाजण जखमी झाले असून एकजण जागीच ठार झाला होता. अपघातामध्ये कंटेनर चालकही किरकोळ जखमी झाला होता. या अपघाताला जबाबदार धरून कंटेनर चालक अंबालाल भट याच्याविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी तिसरी भाषा हवी की नको? त्रिभाषा समितीच्या बैठका सुरू, २१ नोव्हेंबरला समिती सोलापूर दौऱ्यावर

India A beat South Africa A : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर चार गडी राखून दणदणीत विजय ; ऋतुराज गायकवाडचं धडाकेबाज शतक!

विजापूर नाका पोलिसांनी 'त्याला' पकडलेच! गुन्ह्यात जखम झालेला विकी दवाखान्यात गेलाच नाही; विटभट्टी कामगाराच्या सीमकार्डवरून उघडले व्हॉट्‌सॲप अन्‌ गर्लफ्रेंडला कॉल, पण...

१२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप, कशी समजली घटना? वाचा...

Gadchiroli Solar School : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम!

SCROLL FOR NEXT