कोकण

शाळाबाह्य मुले शोध मोहिम सप्टेंबरनंतरही राबवा

CD

-rat३p२३.jpg-
२५N७५०२१
रत्नागिरी ः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या बैठकीला उपस्थित विविध विभागाचे कर्मचारी.
------------
शाळाबाह्य मुले ‘सप्टेंबर ते मे’ अखेर शोधा
वैदेही रानडे ः स्थलांतरित कुटुंबे येण्याचा काळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांची सर्वेक्षण मोहीम फक्त पंधरा दिवसांपुरतीच न ठेवता वर्षभर राबवावी. आंबा व मासळी हंगामात म्हणजेच सप्टेंबर ते मे या कालावधीत परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील स्थलांतरित कुटुंबे कोकणात येतात. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याची शिक्षण विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेत पार पडलेल्या बैठकीला शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षण विभागाने १ ते १५ जुलैदरम्यान सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करणार आहे, असे रानडे यांनी सांगितले. शाळेत न जाणाऱ्या किंवा अनियमितपणे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी सर्वेक्षण केले जाते. शाळेत न जाणाऱ्या मुलांना शाळेत परत आणण्यासाठी किंवा शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक साह्य केले जाते. आर्थिक अडचणीमुळे किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे काही मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरत आहे. त्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश किंवा इतर आवश्यक वस्तू मोफत दिल्या जातात. शिक्षण विभागाकडून हे सर्वेक्षण जिल्ह्यातील गावागावांत, रेल्वेस्टेशन परिसर, झोपडपट्टी परिसर, विविध बांधकामे, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, बसस्थानकं आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. सप्टेंबरनंतर खाण कामगार आणि मासळी हंगाम तर डिसेंबरनंतर आंबा हंगाम सुरू होतो. त्यासाठी परराज्यातून, परप्रांतांतून मजूर, कामगार येत असतात तसेच महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यातील कामगारही येतात. त्यांच्या मुलांनाही शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तर शहरातील नगरपालिका शिक्षण विभागाकडे सोपवण्यात आली आहे.
---
गतवर्षी १८ मुले शिक्षणाच्या प्रवाहात
गतवर्षी जिल्ह्यातील विविध भागांतील १८ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यात आले. त्यातील १० मुले यावर्षीही शाळेत दाखल झालेली आहेत; मात्र उर्वरित ८ मुलांचा संपर्क झालेला नाही. ती मुले नेपाळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशहून आलेल्या कुटुंबामधील होती. कामाच्या निमित्ताने आलेली असल्याने ती पुन्हा आपापल्या भागात रवाना झाली असावीत, असा अंदाज वर्तवला जात आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT