कोकण

तायक्वांदोत युनायटेड इंग्लिश स्कूलचे सुयश

CD

युनायटेड स्कूलचे
तायक्वॉंदोत यश
चिपळूण : चिपळूण तालुकास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. या कामगिरीमुळे आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. १४ वर्ष वयोगटात श्रेया नवनाथ सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. स्वरा नटे, स्मित महाकाळ आणि आराध्य तटकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत आपली चमक दाखवली. १७ वर्ष वयोगटात शर्विल चव्हाण, विनय भावसार, मैत्रेयी पुरोहित, प्रणाली पवार व मुग्धा यादव यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळवत जोरदार कामगिरी केली. शिवम चव्हाणने द्वितीय, तर संघर्ष कदम व शुभ्रद काणेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे, क्रीडा विभागप्रमुख समीर कालेकर, सोमनाथ सुरवसे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

योगासन स्पर्धेत
अंश शिंदेचे यश
चिपळूण : जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा योगासन चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये नांदिवसे शाळेत अंश उमेश शिंदेने बॅकवर्ड बेंड या योगा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांच्या हस्ते त्यांला प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी छत्रपती पुरस्कार प्राप्त पहिली योगापट्टू पूर्वा किनरे हिचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेमध्ये दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत नांदिवसे शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी योगासनाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये दिया जोशी, मंजिरी गोरिविले, आरोही जोशी, रावी बुरटे, सिद्धी पडयाळ, विघ्नेश जोशी या विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल योगा या प्रकारात सहभाग घेतला होता. ओंकार बाबू झोरे याने सुपाईन व अंश उमेश शिंदे बॅकवर्ड बेंड या योगासन प्रकारात सहभाग घेतला होता.

शिर्के विद्यालयात
रानभाज्या प्रदर्शन
चिपळूण : भोम येथील महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रानभाज्या प्रदर्शन भरवण्यात आले. या सोबत स्पर्धकांनी स्वतः तयार केलेली भाज्यांची पाककृतीही मांडली होती. या स्पर्धेत एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
कोकणात ग्रामीण व दुर्गम भागात रानभाज्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतकरी तसेच सुशिक्षित वर्गाला या भाज्याचे महत्त्व जाणून आहेत. या रानभाज्या शरीराचे उत्तम पोषण, संवर्धन, आजारांपासून संरक्षण करतात. रानभाज्या पाककृती स्पर्धेत श्रावणी चव्हाण, तन्मय तामुंडकर, भूषण शिर्के यांनी अनुक्रमे पटकावला. स्पर्धेत वेदिका नरळकर, माऊली वासनिक, दीप्ती उदेग यांना उत्तेजनार्थ क्रमांक काढलेत. यशवंत शिक्षण संस्था, सचिव प्रशांत शिर्के, मुख्याध्यापक तानाजी कांबळे, शिक्षक गणेश सोनवणे, संभाजी कुरुंद, मुकुंद पोटभरे, स्वप्नील आंबेडे यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT