Ajinkya Rahane Ranji Trophy 2024
Ajinkya Rahane Ranji Trophy 2024  esakal
क्रीडा

Ajinkya Rahane : 2 सामने 2 भोपळे! रणजी ट्रॉफीतही अजिंक्यच्या बॅटला लागलेलं ग्रहण सुटलं नाही

अनिरुद्ध संकपाळ

Ajinkya Rahane Ranji Trophy 2024 : भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी धडपडतोय. मात्र त्याच्या बॅटला लागलेलं ग्रहण काही सुटलेलं नाही. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या अजिंक्य रहाणे गेल्या आंध्र प्रदेशविरूद्धच्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता. आता केरळ विरूद्धच्या सामन्यात देखील तो शुन्यावर बाद झाला आहे.

केरळचे वेगवान गोलंदाज बेसिल थम्पी आणि विश्वेश्वर सुरेश यांनी मुंबईची अवस्था 3 बाद 54 धावा अशी केली होती. थम्पीने पहिल्याच चेंडूवर जय बिस्ताला पायचित पकडले. त्यानंतर त्याने मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेची शिकार केली. थम्पीचा चेंडू अजिंक्यच्या बॅटची कडा घेऊन थेट विकेटकिपर संजू सॅमसनच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला.

यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज सुरेशने सुवेद पारकरला 18 धावांवर बाद केले. दुसरीकडे पहिल्या सत्राअखेर भुपेन लालवानी 29 धावा करून नाबाद होता.

रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा रहाणे शुन्यावर बाद झाल्याने त्याच्या फॉर्म आणि आत्मविश्वासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. सध्या मुंबईचा संघ 14 गुणांसह ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर आहे. मात्र केरळविरूद्धच्या सामन्यात त्यांची फलंदाजी ढासळल्याने त्यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे.

केरळचा संघ सध्या चार गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी मुंबईच्या वर्मावर बोट ठेवत पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले आहे. आजच्या सामन्यात अजिंक्यचे शुन्यावर बाद होणे हा चर्चेचा विषय झाला आहे.

टीकाकारांचे तोंड बंद करण्यासाठी अजिंक्यला आपला फलंदाजीतील फॉर्म लवकरात लवकर मिळवावा लागले. तरच त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवून भारताकडून 100 कसोटी सामने खेळण्याचा मान मिळवता येईल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT