SA20 : 42 चेंडूत ठोकल्या 101 धावा! आरसीबीच्या फलंदाजानं SA20 चं मैदान गाजवलं

SA20 Will Jacks
SA20 Will Jacks esakal

SA20 Will Jacks : एसए 20 स्पर्धेत प्रिटोरिया कॅपिटल्सचा सलामीवीर विल जॅक्सने सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट्स पार्कमध्ये झालेल्या सामन्यात शतकी धमाका केला. डरबन सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात इंग्लिश फलंदाज विल जॅक्सने 42 चेंडूत 101 धावांची आक्रमक खेली केली. त्याने या खेळीत 9 षटकार मारले. आयपीएल 2024 मध्ये विल जॅक आरसीबीकडून खेलणार आहे. त्याच्या नावावर SA 20 लीग स्पर्धेत सर्वात वेगवान शतक देखील आहे..

SA20 Will Jacks
Rohit Sharma On Virat Kohli : सहसा असं करत नाही... रोहित शर्मा विराटबद्दल काय म्हणाला?

लीगच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक

विल जॅक्सने दक्षिण आफ्रिका टी 20 लीग (SA20) मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 41 चेंडूत शतक ठोकले. तर 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीत जॅक्सने 8 चौकार आणि 9 षटकारांची आतशबाजी केली. 25 वर्षाच्या या इंग्लिश फलंदाजाने 58 धावांची खेळी केली होती.

प्रिटोरिया कॅपिटल्सने केल्या 204 धावा

प्रिटोरिया कॅपिटल्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 9 बाद 204 धावा केल्या. विल जॅक्सच्या व्यतिरिक्त कॉलिन इंग्रामने 23 चेंडूत 43 धावा करत फिल सॉल्टने 13 चेंडूत 23 धावा केल्या. मात्र प्रिटोरिया कॅपिटल्सचे तळातील फलंदाज चालले नाहीत. एकवेळ संघाची अवस्था 4 बाग 195 धावा इतकी मजबूत होती. मात्र शेवटच्या तीन षटकात कॅपिटल्सने 9 धावात पाच विकेट्स गमावल्या. रीस टॉप्लीने 3 विकेट्स घेतल्या.

SA20 Will Jacks
PCB Mohammad Hafeez : मोहम्मद हाफीजचे दिवस संपले? क्रीडा मंत्रालयानेच छाटले पंख

डरबन जायंट्सचा पराभव

प्रिटोरिया कॅपिटल्सने डरबन जायंट्सचा 17 धावांनी पराभव केला. कॅपिटल्सच्या 205 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या डरबनला 20 षटकात 7 बाद 187 धावांपर्यंतच मजल मारता आली. संघाकडून मॅथ्यू ब्रित्जकेने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर क्विंटन डिकॉक सेट होऊन बाद झाला. शेवटी कर्णधार केशव महाराजने 12 चेंडूत 25 धावा केल्या. मात्र डरबनने सामना 17 धावांनी गमावला.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com