Ashes Series 2023 Pat Cummins Controversy  esakal
क्रीडा

Ashes Series 2023 : खेळ भावना गेली उडत? पॅट कमिन्सच्या पत्रकार परिषदेचा VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Ashes Series 2023 Pat Cummins Controversy : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना अत्यंत नाटकीय स्थितीत संपला. शेवटच्या दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली.

मात्र या सामन्यात ज्या प्रकारे जॉनी बेअरस्टो बाद झाला त्यावरून वादंग माजले आहेत. यादरम्यान, विजयी कर्णधार पॅट कमिन्स पत्रकार परिषदेला सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत कमिन्सला टोमणे वजा प्रश्न विचारण्यात आले. मात्र कमिन्सनेही जोरदार बॅटिंग करत या प्रश्नांचा मारा लिलया पर्तवला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंडर आर्म बॉलवर कमिन्सचा षटकार

इंग्लंडच्या एका पत्रकाराने कमिन्सला सर्वात प्रथम तो खेळ भावनेवर विश्वास ठेवतो का असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्याने पुढचा प्रश्न विचारला की, ज्या प्रकारे पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टोला वादग्रस्त पद्धतीने बाद केले त्यानंतर त्याचा संघ जिंकण्यासाठी अंडर आर्म बॉलिंग किंवा मंकडिंग सारखे प्रकार देखील करणार का?

या टोमणा वजा प्रश्नावर कमिन्स म्हणाला की, 'हे सर्व खेळपट्टी किती पाटा आहे याच्यावर ठरतं. हा एक पर्याय आहे जो मी निवडू शकतो.' कमिन्सने सांगितले की जे काही झालं ते खेळाच्या नियमानुसार होतं आणि निष्पक्ष देखील होतं.

बेअरस्टोबाबत काय घडलं?

सामन्याच्या शेवटच्या दिवशी सामना रंगतदार स्थितीत आला असताना 52 व्या षटकात कॅमरून ग्रीनचा एक चेंडू डक केला. त्यानंतर तो क्रिजच्या बाहेर आला होता. एवढ्यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर एलेक्स कॅरीने डायरेक्ट थ्रो करत बेअरस्टोला बाद केल्याचा आनंद साजरा करू लागला.

तिसऱ्या पंचांनी देखील बेअरस्टोला बाद दिले. बेअरस्टोला बाद दिल्यानंतर मैदानावरील इंग्लंडचे समर्थक खूप नाराज झाले होते. ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 धावांनी जिंकला. मात्र ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियाने बेअरस्टोला बाद केले. त्यावर इंग्लंडचे चाहचे नाराजी व्यक्त करत होते.

सामना झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितले की आम्ही सामना जिंकण्यासाठी अशा प्रकारे आऊट करणार नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT