Usman Khawaja MCC Controversy : उस्मान ख्वाजाला भिडले; MCC ने थेट 3 सभासदांना केलं निलंबित; वाचा नेमकं काय घडलं?

Usman Khawaja MCC Controversy
Usman Khawaja MCC Controversyesakal

Usman Khawaja MCC Controversy : अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलिायने 43 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजाने 187 चेंडूत 77 धावांची झुंजार खेळी केली.

उस्मान ख्वाजाच्या या झुंजार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 370 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 155 धावा ठोकत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र अखेर कांगारूंनी इंग्लंडचा दुसरा डाव 327 धावांवर संपवत मालिकेतील दुसरा विजय मिळवला.

Usman Khawaja MCC Controversy
Asia Cup 2023 : आशिया कपच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, या मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना!

मात्र ऑस्ट्रेलियाच्या या विजयाला वादाची किनार लाभली. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि एमसीसीच्या सभासदांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. एमसीसीच्या काही सदस्यांनी उस्मान ख्वाजाविरूद्ध अपमानजनक शब्दप्रयोग केले होते. त्यानंतर आता मेरिलेबोन क्रिकेट क्लबने ऑस्ट्रेलियन संघाची माफी मागितली.

एमसीसीने वक्तव्य प्रसिद्ध केले. या वक्तव्यात एमसीसी म्हणते की, 'द लाँग रूम ही जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेळी आहे. या रूममधून खेळाडूंना पॅव्हेलियनकडे जाताना सन्मान मिळतो. आजच्या सकाळच्या सत्रातील खेळानंतर, सर्वांचा भावना टिपेला पोहचल्या होत्या. यावेळी दुर्दैवाने काही एमसीसी सभासदांकडून ऑस्ट्रेलियन संघाबद्दल काही आक्षेपार्ह बोललं गेलं.'

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने एमसीसीवर खेळाडूंविरूद्ध अपमानजनक भाषेचा प्रयोग केल्यावरून टीका केली.

Usman Khawaja MCC Controversy
Virat Kohli Rohit Sharma : कोणालाही वेगळा न्याय नाही; रोहित - विराटची T20 कारकीर्द आगरकरच्या हाती?

ख्वाजा चॅनल 9 शी बोलताना म्हणाला की, 'प्रेक्षक खूप भारी आहेत. विशेष करून एमसीसीचे सभासदही चांगले असतात. मात्र काही सभासदांच्या तोंडून काही शब्द बाहेर आले ते खूप निराशाजनक होते. मी तेथे फक्त उभा राहू शकत नव्हतो. त्यामुळे मी त्यांना प्रत्युत्तर दिले.'

ख्वाजा पुढे म्हणाला की, 'सभासदांमधील काही लोकांना तर खूप गंभीर आरोप केले. मा त्यांना याबद्दल विचारणा केली तर ते सुरूच झाले. शेवटी ते इथले सभासद आहेत.'

'त्यामुळे मी फक्त त्यांना त्यांच काय चुकतंय हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. खरं सांगू का त्यांनी खूप अपमानजनक शब्द वापरले. मी या सदस्यांकडून ही अपेक्षा केली नव्हती.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com