Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup : टीम मध्ये रोहितने 'या' खेळाडूला संधी देऊन केली मोठी चूक

आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा हा खेळाडू सतत फ्लॉप राहीला आहे. आगामी सामन्यांमध्ये या खेळाडूला टीम इंडियातून बाहेर जावे लागेल....

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 Team India : आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेनेही सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पराभूत करून अंतिम फेरीकडे वाटचाल सुरू केली आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया ना फलंदाजीत खास होती ना गोलंदाजांना धावा वाचवता आल्या. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला. रोहित शर्माने या खेळाडूवर विश्वास दाखवून कुठेतरी मोठी चूक केली असे सध्या वाटतं आहे.

आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चारही सामन्यांमध्ये रोहित शर्मा वेगवेगळ्या 11 प्लेइंगसह मैदानात खेळायला उतरत होता. श्रीलंकेविरुद्ध मोठा निर्णय घेत त्याने पुन्हा एकदा ऋषभ पंतचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश केला, पण यावेळीही ऋषभ पंत फ्लॉप ठरला. ऋषभ पंतला टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाली होती, त्या मॅचमध्ये तो फ्लॉप ठरला होता.

दिनेश कार्तिकसारख्या वरिष्ठ खेळाडूच्या जागी सलग दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋषभ पंतने 13 चेंडूत 17 धावा केल्या. ही पहिलीच वेळ नाही, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला केवळ 14 धावा करता आल्या. तो सतत कर्णधाराचा निर्णय चुकीचा सिद्ध करताना दिसत आहे.

ऋषभ पंतने टीम इंडियासाठी आतापर्यंत 57 टी-20 सामने खेळले आहेत, परंतु या सामन्यांमध्ये ऋषभ पंतने 23.44 च्या सरासरीने केवळ 914 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने टी-20 क्रिकेटमध्ये केवळ 3 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऋषभ पंत पाकिस्तानविरुद्ध ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून कर्णधार रोहित शर्माही चांगलाच संतापलेला दिसला. येत्या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला पुन्हा एकदा संघात संधी मिळेल का काय माहिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT