Asia Cup 2022 : लंकेनेही लोळवले! रोहित सेनेची 'प्रयोग'शाळा कधी 'निष्कर्षा'पर्यंत पोहचणार?

Asia Cup 2022 Sri Lanka Defeat India 5 Reasons Of Rohit Sharma Team India Losing
Asia Cup 2022 Sri Lanka Defeat India 5 Reasons Of Rohit Sharma Team India Losing esakal

Asia Cup 2022 Sri Lanka Defeat India : भारत आशिया कप सुपर 4 मधील सलग दुसरा सामना हरला. श्रीलंकेने भारताचे 174 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 1 चेंडू राखून पार केले. भारताचे आशिया कपमधील आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. जगातील नंबर वन टीम म्हणून मिरवणाऱ्या भारताने जर तर च्या गणितावर फायनलची आस धरून बसणे सच्या क्रिकेट चाहत्याला न पटणारे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अजून वर्ल्डकपसाठीचे कॉम्बिनेशन सेट करण्याचाच प्रयत्न करत आहे. त्यात दुखापतींमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. (Reasons Of Team India Losing Back To Back Matches In Dubai)

Asia Cup 2022 Sri Lanka Defeat India 5 Reasons Of Rohit Sharma Team India Losing
IND vs SL : चहल - अर्शदीप लढले मात्र लंकेने भारताचे केले पॅक अप

टीम कॉम्बिनेशन

भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यानंतर आपण आशिया कपमध्ये काही कॉम्बिनेशन चाचपून पाहिल्याचे सांगितले. जरी वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून संघाचे कॉम्बिनेशन सेट करणे गरजेचे असले तरी वर्ल्डकपपूर्वी सेट कॉम्बिनेशनवाल्या संघाला काही सामने खेळायला मिळणे आवश्यक आहे. ती संधी आशिया कपमध्ये होती. मात्र भारताचे टीम कॉम्बिनेशन रविंद्र जडेजाच्या दुखापतीमुळे पुरते कोलमडले.

रोहित शर्माने दीपक हुड्डा आणि ऋषभ पंत यांना मॅच फिनिशर म्हणून चाचपून पाहिले मात्र या दोघांनी त्याची निराशाच केली असे म्हणावे लागले. दुसरीकडे जडेजाच्या अनुपस्थितीत फिरकी काम्बिनेशन देखील सेट झाले नाही. मात्र ऑस्ट्रेलियात भारत चार वेगवान गोलंदाज (हार्दिक पांड्यासह) घेऊन खेळेल त्यामुळे ही फार मोठी डोकेदुखी नाही.

मधल्या फळीचे ढेपाळणे

श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि दीपक हुड्डा ही मधली फळी घेऊन मैदानात उतरला. मात्र यातील सूर्यकमार सोडला तर एकालाही 20 धावा देखील करता आल्या नाही. सूर्यकुमार यादव देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे भारताला 15 ते 20 धावा कमी पडल्या. याचा मोठा फटका दुबईसारख्या धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला कायम साथ देणाऱ्या मैदानावर सलग दोन सामन्यात बसला.

फिनिशरचा अभाव

आजच्या सामन्यात ऋषभ पंत आणि दीपक हुड्डा यांच्याकडे मॅचफिनिशन म्हणून पाहिले जात होते. मात्र हे दोघेही 20 व्या षटकापर्यंत बॅटिंग करण्यात अपयशी ठरले. ऋषभ पंतने काही आकर्षक फटकेबाजी केली मात्र त्याला ही खेळी शेवटपर्यंत नेता आली नाही. रोहित म्हणाल्याप्रमाणे ग्राऊंड डायमेंशन डोक्यात ठेवून फटक्यांची निवड करणे गरजेचे आहे. दीपक हुड्डा आणि ऋषभ पंत अजून या बाबतीत कच्चे आहेत.

Asia Cup 2022 Sri Lanka Defeat India 5 Reasons Of Rohit Sharma Team India Losing
Ravindra Jadeja : टीम इंडियासाठी दिलासा! जडेजा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला..

स्लॉग ओव्हरमधली हाराकिरी

आवेश खान आजारी पडल्यामुळे भारताला आशिया कपमधील महत्वाच्या टप्प्यावर एक वेगवान गोलंदाज शॉर्ट पडला. तसेच आवेश खान स्लॉग ओव्हरमध्ये देखील उपयुक्त ठरत होता. मात्र संघाची वेगवान गोलंदाजीची मदार ही फक्त भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्यावरच असल्याने भारताला स्लॉग ओव्हमध्ये फारच कमी ऑप्शन उपलब्ध होते. त्यात भुवनेश्वर कुमारने सलग दोन सामन्यात 19 वे षटक टाकले. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने 19 व्या षटकात 19 धावा दिल्या तर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 14 धावा दिल्या. त्यामुळे शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपसाठी फार कमी धावा शिल्लक राहिल्या. तरी देखील अर्शदीपने प्रभावी मारा करत आपली क्षमता दाखवून दिलीच मात्र सामना जिंण्यात भारताला अपयश आले.

नाणेफेकीचा कौल

सरतेशेवटी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची एक खासियत आहे. या मैदानावर संध्याकाळच्या टी 20 सामन्यात जो नाणेफेक जिंकतो तो अर्धी लढाई जिंकतो. भारत आशिया कपमध्ये सर्व सामने दुबईच्या मैदानावरच खेळला. त्यातील सुपर 4 मधील दोन्ही सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. तसेच प्रथम फलंदाजी करताना जवळपास 190 + चे टार्गेट देणे गरजेचे होते. मात्र पाकिस्तानविरूद्ध भारताला 181 तर श्रीलंकेविरूद्ध 173 धावाच करता आल्या. याचा फटका भारताला दोन्ही सामन्यात बसला.

जरी भारताने सुपर 4 मधील दोन्ही सामने गमावले असले तरी या दोन्ही सामन्यात गोलंदाजीत मर्यादित पर्याय उपलब्ध असतानाही सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com