asia cup 2022 rohit sharma says t20 world cup team setafter loosing sri lanka sports cricket kgm00 sakal
क्रीडा

Asia Cup मध्ये पराभूत होणारा संघ खेळणार T20 World Cup - रोहित शर्मा

आशिया चषकानंतर टी-२० विश्वचषकासाठी संघ जवळपास सज्ज

Kiran Mahanavar

T20 World Cup Team India : आशिया चषक स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचा मंगळवारी श्रीलंकेकडूनही पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की हा संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी फिट नाही. त्याचवेळी संघाचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे की, आशिया चषकानंतर टी-20 विश्वचषकासाठी संघ जवळपास सज्ज झाला आहे. संघ 90 ते 95 टक्के तयार आहे, मात्र संघात काही बदल करायचे आहेत.

ऑक्टोबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. T20 विश्वचषकाच्या संघाबद्दल बोलताना रोहित म्हणाला की आणखी काही खेळाडूंना संधी दिली जाईल. 6 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक सुपर 4 पराभवानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही आणखी काही खेळाडूंना संधी देऊ. त्यानंतर टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केला जाईल. सध्या जो संघ आहे तो टी-20 विश्वचषकासाठी 95 टक्के निश्चित आहे.

आम्ही फक्त दोनच सामने हरलो आहोत. गेल्या विश्वचषकापासून आम्ही जास्त सामने जिंकलो आहेत. हे सामने आम्हाला काहीतरी शिकवलं आहे. आशिया कपमध्ये आम्हाला स्वतःवर दबाव आणायचा होता. आम्ही अजूनही उत्तरे शोधत आहोत.

आशिया चषक 2022 मधील सुपर-फोर सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 174 धावांचे लक्ष्य दिले होते जे त्यांनी 19.5 षटकात पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT