Asia Cup 2022 : अफगाणिस्तानच्या विजयासाठी इंडियाचे देव पाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan and Afghanistan Asia Cup 2022

Asia Cup 2022 : अफगाणिस्तानच्या विजयासाठी इंडियाचे देव पाण्यात

Asia Cup 2022 : भारताला हरवून आत्मविश्वास उंचावत सुपर-४ गटात शानदार सुरुवात करणारा पाकिस्तानचा संघ आज अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून अंतिम फेरी निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे; तर आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तानला या सामन्यात विजय आवश्यक असेल.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर-४ गटात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आज आपापली दुसरी लढत खेळत आहेत. पाकने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे; तर अफगाणिस्तानला श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताला पराभूत केल्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच वेळी अफगाणिस्तानचा संघ थोडासा बॅकफूटवर आहे.

हेही वाचा: Asia Cup : टीम मध्ये रोहितने 'या' खेळाडूला संधी देऊन केली मोठी चूक

अफगाणिस्तानकडे कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. ती त्यांनी साखळी सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश यांना पराभूत करून सिद्धही केली होती; परंतु सुपर-४ मध्ये त्याच श्रीलंकेविरुद्ध त्यांची लय बिघडली होती. त्यामुळे आज पाकिस्तानविरुद्ध नव्याने तयारी करावी लागणार आहे. अफगाणिस्तान-श्रीलंका सामना शारजामध्ये झाला होता; मात्र उद्याचा सामना दुबईत आहे आणि त्यांनी दुबईतील दोन्ही सामने सहज जिंकले होते, ही बाब अफगाणिस्तानच्या पथ्यावर पडू शकते.

अफगाणिस्तानची गोलंदाजी प्रामुख्याने रशीद खानवर अवलंबून आहे. श्रीलंकेविरुद्ध नेमका तोच अपयशी ठरला होता. पहिल्या दोन सामन्यात वेगवान गोलंदाज फारूकीही प्रभावी ठरला होता. उद्या मात्र त्याचा सामना बाबर आझम आणि फॉर्मात असलेल्या महम्मद रिझवान यांच्याशी होणार आहे. रिझवानने भारताविरुद्ध शानदार खेळी करून फॉर्म मिळवला आहे. पाकिस्तानकडे महम्मद नवाझ आणि खुशदिल शहा तसेच आसिफ अली अशी भक्कम मधली फळी आहे. त्यांना रोखण्याची जबाबदारी रशीद खानवर असेल.

हेही वाचा: Irani Cup 2022 : विजेत्या सौराष्ट्रलाही संधी; इराणी करंडक 1 ऑक्टोबरपासून

अफगाणिस्तानकडे हझरतुल्ला

झझारी रेहमतुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झद्रान असे पहिले तीन फलंदाज धावा करत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी चांगले योगदान दिले होते; मात्र मधल्या फळीने निराशा केल्यामुळे त्यांना १७५ धावांपर्यंत मर्यादित रहावे लागले होते. उद्या पाकिस्तानला हरवायचे असेल आणि आव्हान कायम ठेवायचे असेल, तर अफगाणिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे.

Web Title: Asia Cup 2022 Super Four Match 4 Pakistan And Afghanistan Will Face Pak Vs Afg Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..