Asian Games 2023 ESAKAL
क्रीडा

Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी; जिंकलं 41 वर्षातलं पहिलं पदक

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताने घोडेस्वारी प्रकारात तब्बल 41 वर्षानंतर पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. भारतीय संघात दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, छेडा, अनुष अगरवाल्ला यांचा समावेश आहे. भारताने आतापर्यंत 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 14 पदके जिंकली आहेत. भारताचे हे आजच्या दिवसातील तिसरे पदक आहे.

भारताने इक्वेस्टेरियन (घोडेस्वारी) ड्रेसेज टीमने चीन आणि हाँगकाँग सारख्या तगड्या संघांना मात देत आपले या क्रीडा प्रकारातील पहिले विहिले सुवर्ण पदक जिंकले. संघातील दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, छेडा, अनुष अगरवाल्ला यांनी एकूण 209.205 गुण मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

एशियन गेम्समधील आजच्या दिवसात भारताचे हे आजचे तिसरे पदक आहे. यापूर्वी नौकानयनमध्ये भारताच्या नेहा ठाकूरने रौप्य इबादत अलीने कांस्य पदक जिंकले होते.

आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारताची नौकानयपटू नेहा ठाकूरने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. आजच्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक होते. याचबरोबर सेलिंगमध्येच विंड सर्फर स्पर्धेत इबादत अलीने कांस्य पदक जिंकले होते.

आता घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. भारताने आतापर्यंत एकूण 14 पदके जिंकली आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 2 सुवर्णांसह 11 पदके जिंकली होती. तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: सचिन अहिरांच्या घरात २.६० कोटींची चोरी, ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने मारला डल्ला; प्रकरण कसे आले उघडकीस?

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ची पातळी वाढणार; नाशिकला गोदेला महापूर, ‘नांदूर मधमेश्वर’मधून मोठा विसर्ग

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर इंटरनेट बंदीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची तातडीची सुनावणी; सरकारच्या निर्णयाला आव्हान

प्राजक्ता माळीनं केलंय किंग खानसोबत काम! एका सीनसाठी घेतलेले 17 टेक; SRKसोबतची जुनी क्लिप व्हायरल

IND vs ZIM T20I Schedule: वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात चमकला... आता भारत-झिम्बाब्वे यांच्यातला पुढील सामना केव्हा?

SCROLL FOR NEXT